चार्टर्ड अकाउंटंट हे राष्ट्रनिर्माते - देवेंद्र दर्डा यांचे प्रतिपादन
By admin | Published: July 14, 2015 01:07 AM2015-07-14T01:07:44+5:302015-07-14T01:07:44+5:30
चार्टर्ड अकाऊन्टंट हा कॉर्पोरेट भारताचा कणा असून राष्ट्रनिर्माते म्हणून त्यांची भूमिका मोलाची असल्याचे प्रतिपादन लोकमत मीडिया समूहाचे व्यवस्थापकीय संचालक
नागपूर : चार्टर्ड अकाऊन्टंट हा कॉर्पोरेट भारताचा कणा असून राष्ट्रनिर्माते म्हणून त्यांची भूमिका मोलाची असल्याचे प्रतिपादन लोकमत मीडिया समूहाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी येथे केले. गुंतवणूक असो वा करविषयक सल्ला, उद्योजकांना कोणतेही ठोस निर्णय सीएविना घेणे शक्य नाही. त्यांच्या सल्ल्यामुळेच रोजगारनिर्मिती होते आणि देशाला कर स्वरूपात महसूल मिळतो, असे ते म्हणाले.
इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊन्टंट आॅफ इंडियाच्या (आयसीएआय) पश्चिम विभागांतर्गत कार्यरत नागपूर सीए शाखेच्या वेस्टर्न इंडिया सीए विद्यार्थी असोसिएशन (डब्ल्यूसीएएसए) अर्थात ‘विकासा’च्या वतीने उत्तर अंबाझरी मार्गावरील आयएमए सभागृहात आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून देवेंद्र दर्डा बोलत होते.
समारंभात मंचावर आयसीएआयच्या बोर्ड आॅफ स्टडिजचे उपाध्यक्ष नीलेश विकमसी, आयसीएआयचे माजी अध्यक्ष उत्तमप्रकाश अग्रवाल, ‘विकासा’ चेअरमन हार्दिक शाह, विभागीय परिषदेचे सदस्य जुल्फेश शाह,
नागपूर शाखेच्या अध्यक्षा कीर्ती अग्रवाल, ‘विकासा’ नागपूरचे चेअरमन सुरेन दुरगकर, परिषदेचे समन्वयक स्वप्नील अग्रवाल, नागपूर सीए संस्थेचे सचिव संदीप जोतवानी, ‘विकासा’ नागपूरचे उपाध्यक्ष योगेश अमलानी आणि सचिव शिवानी सारडा उपस्थित होते.