भारतासमोर २२९ धावांचे आव्हान ; इंग्लंड ५० षटकात ७ बाद २२८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 06:42 PM2017-07-23T18:42:29+5:302017-07-23T18:42:29+5:30

लॉर्डसवर सुरु असलेल्या अत्यंत उत्कंठा वर्धक अशा महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने ५० षटकात ७ बाद २२८ अशी धावा संख्या उभारली आहे .

Chasing 229 against India England scored 228 for 7 in 50 overs | भारतासमोर २२९ धावांचे आव्हान ; इंग्लंड ५० षटकात ७ बाद २२८

भारतासमोर २२९ धावांचे आव्हान ; इंग्लंड ५० षटकात ७ बाद २२८

Next

ऑनलाईन लोकमत

लंडन - लॉर्डसवर सुरु असलेल्या अत्यंत उत्कंठा वर्धक अशा महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने ५० षटकात ७ बाद २२८ अशी धावा संख्या उभारली आहे . आत्मविश्वासपूर्ण भारतीय संघ आता २२९ धावाचे आव्हान कसे पेलतो हे पाहणे आता नक्कीच क्रिकेटच्या चाहत्यांना पर्वणी ठरणारे असेल.

या निर्णायक अंतिम सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. डावाच्या सुरवातीलाच भारतीय गोलंदाजाने टिच्चून गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजाला नामोहरम केले. झुलन गोस्वामी आणि शिखा पांडेनी यांनी अचूक गोलंदाजी करत सलामीच्या फलंदाजांना जम बसू दिला नाही. मात्र, भारतीय कर्णधार मिताली राज विकेटच्या प्रतीक्षेत होती. गोलंदाजी बदल म्हणून  राजने चेंडु फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडच्या हाती सोपवला.  राजेश्वरीची  गोलंदाजी दोन्ही फलंदाजांनी सहज खेळून काढत धावगती वाढवली. शेवटी राजेश्वरी गायकवाडनेच लॉरेन विनफील्डला (२४ धावा ) बोल्ड करत सलामीची जोडी फोडली. यावेळी धावसंख्या होती ११.१ षटकात ४७ वर १ बाद.
 
यानंतर पुनम यादवच्या फिरकीच्या जाळ्यात इंग्लंडच्या महिला फलंदाज अडकल्या. पुनमने टॅमी बेमाँट (२३ धावा ) आणि कर्णधार हेदर नाईटला (१ धाव ) माघारी  धाडत सामन्यावर भारताची पकड मजबूत केली. ठराविक अंतराने पडलेल्या ३ विकेटमुळे गडगडलेला इंग्लंडचा डाव अखेर टेलर (४५ धावा ) व नतालीची या जोडीने सावरला. दोघींनी  जबरदस्त फलंदाजी करत ८६ धावांची भागीदारी केली. हि जोडी फुटल्यास इतर फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरली.
 
ठराविक अंतराने फलंदाज बाद  होत राहिल्याने इंग्लंड २०० धावा हि करेल कि नाही हि  शंका होती. परंतु ; नताली शिवर ने एका बाजूने किल्ला लढवत ५१ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. शेवटच्या काही षटकात ,कॅथरीन ब्रन्ट ३४ धावा व जेनी गुन्न २५ धावा यांच्यामुळे इंग्लंडला २२८  अशी समाधान समाधानकारक धावसंख्या उभारण्यात यश आले. भारतातर्फे झुलन गोस्वामीने २३ धावदेत ३ तर पूनम यादवने ३६ धावादेत २ फलंदाजांना बाद केले. 
 

Web Title: Chasing 229 against India England scored 228 for 7 in 50 overs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.