शास्ती करमाफीस मुख्यमंत्री सकारात्मक

By admin | Published: May 16, 2016 01:33 AM2016-05-16T01:33:16+5:302016-05-16T01:33:16+5:30

शास्ती कर माफ करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शविली आहे

Chastening the Chief Minister of the Chief Minister | शास्ती करमाफीस मुख्यमंत्री सकारात्मक

शास्ती करमाफीस मुख्यमंत्री सकारात्मक

Next

चिंचवड : शास्ती कर माफ करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शविली आहे, अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांनी कौन्सिल हॉल येथे बैठक घेतली. खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत बैठकीत मागणी केली. बारणे म्हणाले, ‘‘अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सरकारने लवकर मार्गी लावावा. अनधिकृत बांधकामावर जो शास्ती कर सुरू आहे, तो रद्द करावा. यावर मुख्यमंत्री यांनी तत्काळ उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘हो सर्वसामान्यांसाठी शास्ती कर अन्यायकारक आहे. तो केवळ पिंपरी-चिंचवड नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील शास्ती कर माफ करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. तशा सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी बैठकीत दिल्या. प्राधिकरणाच्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त भागात सर्व नागरी सुविधा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने दिल्या आहेत व गेली अनेक वर्षे होऊनही प्राधिकरणाच्या वतीने सिडकोप्रमाणे आरक्षणे विकसित केली नाहीत.
प्राधिकरणाकडून सर्वसामान्य नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण पिंपरी-चिंचवड महापालिकेत विलीन करावे. १९८४ पूर्वीच्या शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा द्यावा, तसेच पवना
धरण प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या मुलांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत पाच टक्के कोट्यात नोकरीसाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणी
केली. याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले.’’(वार्ताहर)

Web Title: Chastening the Chief Minister of the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.