आंदणात शौचालय मागणाऱ्या चैताली राठोडचा उद्या दिल्लीत गौरव
By admin | Published: September 16, 2016 11:06 AM2016-09-16T11:06:09+5:302016-09-16T11:06:09+5:30
लग्नामध्ये आंदणात शौचालयाची मागणी करणा-या चैताली राठोडला उद्या लाख रुपयांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे
Next
>राजेश्वर वैराळे / ऑनलाइन लोकमत
बोरगाव वैराळे (अकोला), दि. 16 - लग्नामध्ये आंदणात शौचालयाची मागणी करणा-या चैताली राठोडला उद्या लाख रुपयांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. दिल्ली येथील सुलभ इंटरनॅशनल कंपनीच्या वतीने चैताली राठोडला दहा लाखांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. या पुरस्काराचे वितरण उद्या १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला केद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांच्या हस्ते दिल्ली येथील आयोजित कार्यक्रमात देण्यात येणार आहे.
कारंजा रमजानपुर माहेर असलेल्या चैताली राठोड हिचे लग्न यवतमाळ जिल्ह्यातील गाळखे नामक व्यक्ती बरोबर जुळले होते. त्यांच्याकडे शौचालय नसल्यामुळे या उपवर मुलीने लग्नात आणंद म्हणून शौचालयाची मागणी केली होती. तिची मागणी राठोड कुटुंबातील सदस्यांनी मान्य करून तिला आंदणात शौचालयाची अनोखी भेट दिली होती. याबाबत सर्वप्रथम लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. वृत्ताची दखल घेवून दिल्ली येथील सुलभ इंटरनॅशनल कंपनीच्या वतीने दहा लाखांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
यापूर्वी तिला महाराष्ट्र सरकारने स्वच्छता दूत म्हणून निवड करून पुरस्कार दिला आहे. चैताली राठोडने या पुरस्काराचे श्रेय लोकमतला दिले असून आभारदेखील मानले आहेत.