काश्मिरी पंडिताच्या मताधिकारावर गप्प का - उद्धव ठाकरेंचा सवाल

By admin | Published: April 14, 2015 09:41 AM2015-04-14T09:41:28+5:302015-04-14T09:48:58+5:30

मुसलमानांच्या मताधिकाराची काळजी वाटणारे ढोंगी मंडळी काश्मिरी पंडितांच्या हक्काबद्दल गप्प का बसतात असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे

Chatmari pundita's voter chat - The question of Uddhav Thackeray | काश्मिरी पंडिताच्या मताधिकारावर गप्प का - उद्धव ठाकरेंचा सवाल

काश्मिरी पंडिताच्या मताधिकारावर गप्प का - उद्धव ठाकरेंचा सवाल

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १४ - जम्मू काश्मीर निवडणुकीत किती काश्मिरी पंडितांना मतदानाचा हक्क बजावता आला होता, मुसलमानांच्या मताधिकाराची काळजी वाटणारे ढोंगी मंडळी काश्मिरी पंडितांच्या हक्काबद्दल गप्प का बसतात असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे 

मुसलमानांचा मताधिकार काढून घ्या अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. या मागणीवरुन काँग्रेससह सर्वच पक्षांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली असून मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून विरोधकांचा प्रत्युत्तर दिले. लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या घरी बसून जीवन जगण्याचा अधिकार असून हाच अधिकार काश्मीरमधील हिंदू पंडितांनाही लागू होतो. या भूमीपुत्रांची घरवापसी करणे गरजेचे असून याबाबतीत जम्मू काश्मीरमधील पीडीपी - भाजपा सरकारला तातडीने निर्णय घ्यावाच लागेल असेही ठाकरेंनी म्हटले आहे.  भारत हा हिंदूंचा देश असून हिंदूंचे अधिकार, हक्क याविषयी बोलण्याची परवानगी नाही. पण बिगर हिंदू विशेषतः मुसलमानांच्या अधिकारी भयंकर काळजी घेतली जाते असा टोलाही उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला.  

 

Web Title: Chatmari pundita's voter chat - The question of Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.