चौफुल्याची न्यू अंबिका संगीत पार्टी प्रथम
By Admin | Published: February 2, 2016 04:11 AM2016-02-02T04:11:43+5:302016-02-02T04:11:43+5:30
२४ व्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत पारंपरिक गटात यवत-चौफुला (जि.पुणे) येथील न्यू अंबिका कला केंद्र या संगीत पार्टीने प्रथम क्रमांक पटकाविला.
अकलूज : २४ व्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत पारंपरिक गटात यवत-चौफुला (जि.पुणे) येथील न्यू अंबिका कला केंद्र या संगीत पार्टीने प्रथम क्रमांक पटकाविला. २५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने २९ ते ३१ जानेवारी दरम्यान २४ व्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक गटात १४ संघांनी भाग घेतला होता. लावणी स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच चौफुला संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील द्वितीय क्रमांक ऊर्मिला नगरकर, पिंंजरा सांस्कृतिक कला केंद्र, वेळे जि. सातारा व वैशाली समलासपूरकर, जय अंबिका कला केंद्र, सणसवाडी जि. पुणे या संघांना विभागून देण्यात आला. त्यांना प्रत्येकी २० हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देण्यात आले. तृतीय क्रमांक राजलक्ष्मी लोकनाट्य कला केंद्र, बार्शी या संघाने पटकाविला. त्यांना रुपये १५ हजार रोख व सन्मानचिन्ह देण्यात आले. चतुर्थ क्रमांक लंका नयना प्रतीक्षा अकोलकर, पिंंजरा सांस्कृतिक कला केंद्र, वेळे जि. सातारा या संघास रोख रुपये १० हजार व सन्मानचिन्ह देण्यात आले. पाचवा क्रमांक मोडनिंंब जि. सोलापूर येथील वैशाली वाफळेकर नटरंग लोकनाट्य कला केंद्र या संघास रुपये ५ हजार व सन्मानचिन्ह देण्यात आले. (प्रतिनिधी)
रौप्य महोत्सवी वर्षात
१६ संघांचा सहभाग
राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे २०१७ हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. पुढील वर्षी २८ व २९ जानेवारी रोजी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. पारंपरिक गटातील ९ व व्यावसायिक गटांतील ७ अशा निवडक १६ संघांनाच स्पर्धेत सहभागी करून घेतले जाईल व प्रत्येक संघाला रुपये एक लाख मानधन दिले जाईल, असे विजयसिंह मोहिते-पाटील म्हणाले.