स्वाभिमान असेल तर चौहान यांनी स्वत:हून पद सोडावे - FTII वादावर पवारांचे भाष्य
By Admin | Published: September 5, 2015 12:31 PM2015-09-05T12:31:08+5:302015-09-05T14:21:54+5:30
चौहान यांना स्वाभीमान असेल तर त्यांनी स्वत: पदाचा राजीनामा द्यावा असे भाष्य शरद पवार यांनी FTII वादावर केले आहे.
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ५ - एफटीआयआयच्या ( फिल्म अँड टेल्विहजन इन्स्टिट्युट) अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून सुरू असलेल्या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही उडी मारली आहे. 'त्यांना( गजेंद्र चौहान) स्वाभिमान असेल तर त्यांनी स्वत:हून पदाचा राजीनामा द्यावा' असे सांगत चौहान यांचे नाव न घेता पवारांनी त्यांच्यावर टीका केली.
पुण्यातील प्रतिष्ठित एफटीआयआयच्या अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांची नियुक्ती वादात सापडली आहे. त्याविरोधात संस्थेचे विद्यार्थी दोन महिन्यांहून अधिक काळ आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला अभिनेते अमोल पालेकर, नाना पाटेकर, अनुपम खेर, ऋषी कपूर, रणबीर कपूरसह अनेक दिग्गजांनी पाठिंबा दर्शवला आहे. आता त्यात राजकारणी शरद पवार यांचीही भर पडली आहे.
चौहान यांना पदावरू काढण्याची विद्यार्थ्यांची मागणी मान्य करण्यास सरकार तयार नसून दुसरीकडे चौहान हेही पदावरून पायउतार होण्यास राजी नाही. सरकारच्या या आडमुठेपणामुळे विद्यार्थ्यांनीही आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे.