चौहानांच्या हकालपट्टीला राज्यमंत्र्यांची बगल

By admin | Published: October 21, 2015 02:27 AM2015-10-21T02:27:58+5:302015-10-21T02:27:58+5:30

एफटीआयआयमधील २००८च्या विद्यार्थ्यांचे अपूर्ण राहिलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र स्टुडिओ उपलब्ध करून देण्यात येतील, केवळ इतके आश्वासन देण्यापलीकडे केंद्रीय माहिती

Chauhan's expulsion to the state minister | चौहानांच्या हकालपट्टीला राज्यमंत्र्यांची बगल

चौहानांच्या हकालपट्टीला राज्यमंत्र्यांची बगल

Next

पुणे : एफटीआयआयमधील २००८च्या विद्यार्थ्यांचे अपूर्ण राहिलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र स्टुडिओ उपलब्ध करून देण्यात येतील, केवळ इतके आश्वासन देण्यापलीकडे केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी कोणतीही
ठोस घोषणा केली नाही. उलट संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावरून गजेंद्र चौहान यांची हकालपट्टी करण्याच्या स्टुडंट असोसिएशनच्या मागणीला बगल देत ‘गजेंद्र चौहान हा वादाचा मुद्दा नाही’ अशा शब्दांत विद्यार्थ्यांची त्यांनी बोळवण केली.
चौहान यांच्यासह इतर सदस्यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा मंगळवारी १३१ वा दिवस होता. आजपर्यंत विद्यार्थ्यांची मंत्रालयाच्या प्रतिनिधींबरोबर तीन वेळा बैठक झाली. मात्र तारीख पे तारीख’च्याव्यतिरिक्त काहीही साध्य झाले नाही. १० आॅक्टोबरला झालेल्या बैठकीत राज्यवर्धन राठोड यांच्याबरोबर एक बैठक होईल; त्यामध्ये आंदोलनावर काहीतरी तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र पुन्हा विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेण्यापलीकडे राठोड यांनी कोणतीच ठोस भूमिका जाहीर केली नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न
करू, एवढेच आश्वासन त्यांनी
दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Chauhan's expulsion to the state minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.