भाऊराव कारखान्यावर चव्हाण यांचे वर्चस्व

By admin | Published: January 19, 2016 03:47 AM2016-01-19T03:47:30+5:302016-01-19T03:47:30+5:30

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना संचालकपदाच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या शेतकरी विकास पॅनलने सेना-भाजपा-राष्ट्रवादी

Chavan dominates Bhaurao factory | भाऊराव कारखान्यावर चव्हाण यांचे वर्चस्व

भाऊराव कारखान्यावर चव्हाण यांचे वर्चस्व

Next

नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना संचालकपदाच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या शेतकरी विकास पॅनलने सेना-भाजपा-राष्ट्रवादी या महाआघाडीचा धुव्वा उडवित सर्व २१ जागांवर विजय मिळविला आहे़
कारखान्याची चौथी निवडणूक आहे़ मागील निवडणुकीतही विरोधकांनी महाआघाडी केली होती़ भोकरच्या आ़ अमिता चव्हाण आधीच बिनविरोध निवडून आल्या आहेत़ रविवारी २० जागांसाठी मतदान झाले होते.
काँग्रेसचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- ऊस उत्पादक गट लक्ष्मीनगरमधील विजयी उमेदवारांची नावे अशी- अ‍ॅड़ सुभाष कल्याणकर, गणपतराव तिडके, प्रवीण देशमुख, ऊस उत्पादक गट बारड- व्यंकटराव कल्याणकर, कैलास दाड, शिवाजीराव पवार, ऊस उत्पादक गट मुदखेड- किशनराव पाटील, बालाजी शिंदे, माधवराव शिंदे, ऊस उत्पादक गट आमदुरा- दत्तराम आवातिरक, अशोक कदम, भीमराव कल्याणे, ऊस उत्पादक गट मालेगाव - रंगराव इंगोले, रामराव कदम, मोतीराम जगताप, महिला गट -निलावतीबाई संभाजी मोरे, कमलबाई दत्तराव सूर्यवंशी.
अनुसूचित जाती व जमाती मतदारसंघ - आनंदा पुरबाजी सावते़ भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागासवर्गीय प्रवर्ग- साहेबराव लछमाजी राठोड, इतर मागासवर्गीय प्रवर्ग- सुभाषराव माधवराव देशमुख़ (वार्ताहर)

Web Title: Chavan dominates Bhaurao factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.