चव्हाणांचा गुन्हा रद्द का नाही ?

By admin | Published: June 25, 2014 01:38 AM2014-06-25T01:38:28+5:302014-06-25T01:38:28+5:30

अशोक चव्हाण यांना आदर्श सोसायटी घोटाळ्यातून मुक्ती का देत नाही, असा सवाल करणारा अर्ज उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आह़े या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आह़े

Chavan's crime is not canceled? | चव्हाणांचा गुन्हा रद्द का नाही ?

चव्हाणांचा गुन्हा रद्द का नाही ?

Next
>मुंबई :  नागपूर येथील उच्च न्यायालय विधि व कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्था वकीलांसाठी असताना तेथे न्या़ ए़ एम़ बदर यांना जिल्हा न्यायाधीश असताना घर मिळाल्याचा आरोप आह़े असे असताना बदर यांना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती मिळाली़ मग अशोक चव्हाण यांना आदर्श सोसायटी घोटाळ्यातून मुक्ती का देत नाही, असा सवाल करणारा अर्ज उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आह़े या अर्जावर  बुधवारी सुनावणी होणार आह़े 
 अॅड़ भगवान महादेवराव लोणारे यांनी अॅड़ सतिश उके यांच्यामार्फत हा अर्ज केला आह़े  या अर्जानुसार, नागपूर येथील वकीलांना घरे मिळावी या उद्देशाने वरील गृहनिर्माण संस्था स्थापन केली़ यासाठी तेथील सरकारी वकील ए़ साम्बरे यांनी प्रयत्न केल़े त्यावेळी सध्या उच्च न्यायालयात न्यायाधीश असलेले बदर हे जिल्हा न्यायाधीश होत़े तरीही साम्बरे यांच्या मदतीने बदर यांना या सोसायटीत घर मिळाल़े याची तक्रार उच्च न्यायालयालाचे मुख्य न्यायाधीश यांना केली़ पोलिसांनीही याची दखल न घेतल्याने महानगर दंडाधिकारी न्यायालयात याची तक्रार दाखल करण्यात आली़ तेथे देखील निराशाच पदरी पडली़ हे सर्व सुरू असताना साम्बरे यांचीही उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आह़े (प्रतिनिधी) 

Web Title: Chavan's crime is not canceled?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.