शाईविना 'त्यांचे' मतदान !

By admin | Published: February 22, 2017 02:04 PM2017-02-22T14:04:38+5:302017-02-22T14:04:38+5:30

व्हीएमव्ही कॉलेजच्या होम सायन्स विभागातील मतदान केंद्रात मंगळवारी सकाळी आगळा प्रकार घडला.

Chawivina 'their' voting! | शाईविना 'त्यांचे' मतदान !

शाईविना 'त्यांचे' मतदान !

Next

शाईविना 'त्यांचे' मतदान !
अमरावती : व्हीएमव्ही कॉलेजच्या होम सायन्स विभागातील मतदान केंद्रात मंगळवारी सकाळी आगळा प्रकार घडला. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी ओकांर तुळशीराम बिटने यांच्या बोटावर शाई न लावल्याने त्यांनी तसेच मतदान केले. ओकांर बिटने दाम्पत्य सकाळी ९ वाजता मतदान करण्याकरिता गेले होते. दरम्यान मतदान यादीवर त्यांच्या पत्नीचे नाव चुकीचे असल्यामुळे ही बाब त्यांनी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. दरम्यान मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी ओकांर बिटने यांच्या बोटाला शाई लावली नाही, तर केवळ त्यांच्या पत्नीच्या बोटालाच शाई लावण्यात आली. त्यामुळे ओंकार बिटने यांनी विनाशाईनेच मतदान केले. या प्रकारावरून मतदान केंद्रावरील अधिकारी किती समयसुचकतेने काम करतात, हे दिसून आले. विनाशाईने मतदान केल्याचा सेल्फी ओंकार बिटने यांनी काढला आणि प्रसिद्धी माध्यमांना पाठविला.

Web Title: Chawivina 'their' voting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.