क्रेडिट कार्ड क्लोन करून फसवणूक

By Admin | Published: March 7, 2017 03:20 AM2017-03-07T03:20:52+5:302017-03-07T03:20:52+5:30

वृंदावन सोसायटीतील एका रहिवाशाचे क्रेडिटकार्ड ‘क्लोन’ करून सुमारे २८ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला.

Cheating by credit card clone | क्रेडिट कार्ड क्लोन करून फसवणूक

क्रेडिट कार्ड क्लोन करून फसवणूक

googlenewsNext


ठाणे : वृंदावन सोसायटीतील एका रहिवाशाचे क्रेडिटकार्ड ‘क्लोन’ करून सुमारे २८ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला.
रवींद्र रंगनाथ अय्यर यांचे आयसीआयसीआय बँकेत खाते आहे. १ मार्च रोजी दुपारी त्यांच्या खात्यातून लागोपाठ तीन वेळा परस्पर खरेदी करण्यात आली. ४ वाजून ५३ मिनिटांनी १० हजार रुपये, ४ वाजून ५४ मिनिटांनी १६ हजार ७५ रुपये, तर ४ वाजून ५७ मिनिटांनी १ हजार ८३८ रुपये अशी एकूण २७ हजार ९१३ रुपयांची खरेदी अज्ञात आरोपीने एका दुकानातून केली.
अय्यर यांचे क्रेडिटकार्ड त्यांच्याजवळच असतानाही त्यांच्या खात्यातून परस्पर खरेदी करण्यात आली. आरोपीने त्यांच्या क्रेडिटकार्डाचे क्लोनिंग केले असावे, असा संशय अय्यर यांनी व्यक्त केला आहे. अय्यर यांच्या तक्रारीवरून राबोडी पोलिसांनी रविवारी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)

Web Title: Cheating by credit card clone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.