सहलीसाठी सोयींचे आमिष दाखवून पावणोदोन लाखांची फसवणूक
By Admin | Published: October 2, 2014 11:56 PM2014-10-02T23:56:02+5:302014-10-02T23:56:02+5:30
सहलीदरम्यान सोयी- सुविधा देण्याचे आमिष दाखवून पावणोदोन लाख रुपये घेऊनही मेंबरशिप कार्ड न दिल्याप्रकरणी कंट्री व्हेकेशन क्लबला ग्राहक मंचाने दणका दिला आहे.
>पुणो : सहलीदरम्यान सोयी- सुविधा देण्याचे आमिष दाखवून पावणोदोन लाख रुपये घेऊनही मेंबरशिप कार्ड न दिल्याप्रकरणी कंट्री व्हेकेशन क्लबला ग्राहक मंचाने दणका दिला आहे. तक्रारदाराकडून घेतलेली पावणोदोन लाख रुपयांची रक्कम परत करण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे.
याप्रकरणी स्वाती शशिकांत देशपांडे (रा. सिंहगड रोड) यांनी तक्रार दाखल केली होती.
त्यांनी कंट्रीचे व्यवस्थापक, हैदराबाद, कंट्री व्हेकेशन संचालक बंडगार्डन यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. तक्रारदार बिग बझार येथे खरेदी करण्यासाठी गेले असता त्यांच्याकडून कूपन भरून घेण्यात आले. त्यांना लकी नंबर लागलेला असून बक्षीस घेऊन जा, असे सांगण्यात आले. तक्रारदार देशपांडे यांचे पती कंट्री व्हेकेशनच्या कार्यालयात गेले. तेथील प्रतिनिधीने त्यांना सहलींबाबत आणि पर्यटनाबद्दलच्या सेवा- सुविधांची माहिती दिली.
सहलीचा राहण्याचा व खाण्याचा खर्च, मेडिकल सुविधा, कोणते कार्य किंवा कार्यक्रम असल्यास कार्यालय डेकोरेटरसह नि:शुल्क मिळेल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर कंट्री व्हेकेशन क्लबच्या प्रतिनिधीने त्यांच्या घरी जाऊन 3क् वर्षाच्या प्लॅनची माहिती सांगितली.
तक्रारदार यांनी चेकद्वारे पावणोदोन लाख रुपये दिले. तक्रारदाराने मेंबरशिप कार्डसाठी विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. दोनदा नोटीस पाठवूनही त्यांना उत्तर देण्यात आले नाही. भरलेली रक्कम परत देण्यास नकार देण्यात आला. तक्रारदारांनी पुणो जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात, सदस्य मोहन पाटणकर, क्षितिजा कुलकर्णी या मंचाकडे तक्रार दाखल केली. कंट्री व्हेकेशनतर्फे मुख्य कार्यालय हैदराबाद येथे असल्याने पुणो ग्राहक मंचाला तक्रार चालविण्याचा अधिकार नसल्याचा युक्तिवाद केला. तक्रारदाराकडून घेतलेली पावणोदोन लाख रुपयांची रक्कम परत करावी. शारीरिक नुकसानभरपाईपोटी दहा हजार आणि तक्रारीचा खर्च म्हणून दोन हजार रुपये द्यावेत, असा आदेश ग्राहक मंचाने दिला.
4कंट्री व्हेकेशन हे जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीर्पयत व्यवसाय करतात. त्यांचे रिसॉटर्स आणि मालमत्ता देशभर आहे. अशा परिस्थितीमध्ये वाद उद्भवल्यास देशभरातील ग्राहकांना करारातील अटींवर बोट दाखवून हैदराबाद आणि सिकंदराबाद न्यायालयात पाठविणो गैरवाजवी आहे.
4 देशभरात सेवेची विक्री करणो आणि वादाच्या कारणासाठी ग्राहकाला हैदराबाद किंवा सिकंदराबाद न्यायालयाच्या कार्यक्षेत्रच्या बंधनात अडकविणो चुकीची अपेक्षा आहे, असे मत ग्राहक मंचाने निकालात म्हटले आहे.