नोकरीच्या नावाखाली तरुणांची फसवणूक
By admin | Published: May 16, 2016 03:09 AM2016-05-16T03:09:07+5:302016-05-16T03:09:07+5:30
नोकरी तर नाहीच, उलट घेतलेले पैसे व पासपोर्ट न देता तरुणांनाच जेलमध्ये टाकण्यासाठी धमकावले जात आहे.
मीरा रोड : परदेशात नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नोकरी तर नाहीच, उलट घेतलेले पैसे व पासपोर्ट न देता तरुणांनाच जेलमध्ये टाकण्यासाठी धमकावले जात आहे. सध्या तरी महाराष्ट्र व झारखंडमधील तरुणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मीरा रोड येथील नयानगर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्र ार अर्ज दिला आहे.
पूनम सागर कॉम्प्लेक्समध्ये इश्तिहाक सर्जी याचे ‘ओव्हरसिस फ्युचर कन्सल्टन्सी’ हे कार्यालय आहे. अरु णाचल व आसाम येथे ‘फ्युचर करिअर’ ही मुख्य एजन्सी आहे. सर्जी याने वृत्तपत्रात जाहिरात देऊन परदेशात नोकरीची हमी दिली होती. त्याआधारे मेकॅनिकल डिप्लोमा केलेले नागपूरचे संदीप धाबरडे व झारखंडचे तापेश्वर महतो सर्जीच्या संपर्कात आले. त्यांनी त्यांना दुबईत नोकरीचे आश्वासन दिले होते. महतो यांच्याकडून क्वॉलिटी कंट्रोलरच्या नोकरीसाठी एक लाख आठ हजार रु पये तर संदीप यांच्याकडून ९७ हजार रु पये घेण्यात आले. त्यासाठी त्यांनी पुण्यातील हातची नोकरीही सोडली होती. नालासोपारा येथील आठवी शिकलेल्या रमेश पवार याला सिंगापूर येथे हेल्परची नोकरी दिली जाणार होती. त्यासाठी त्याच्याकडून ८० हजार रुपये उकळण्यात आले.
महतो आणि संदीप यांना चक्क मजूर म्हणून दोन महिन्यांचा व्हिसा असल्याचा कागद व विमानाची बोगस तिकिटे देण्यात आली. परंतु, नंतर त्यांना सौदी अरेबियात ट्रेनिंग होणार आहे, पण लेबर व्हिसा मिळाला, असे सांगण्यात आले. मात्र, इंजिनीअरिंगच्या नोकरीसाठी पैसे भरणाऱ्या तापेश्वर व संदीप यांनी आक्षेप घेताच केवळ वेळकाढू उत्तरे देण्यात आली. तर, रमेशलाही सौदीला सुपरवायझरची नोकरी देतो, असे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात नोकरी मिळालीच नाही. तसेच पैसेही देण्यात टाळाटाळ करण्यात आली. या तरु णांना आसाम येथे बोलवून अनेक महिने थांबवण्यात आले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पैसे व पासपोर्ट मागितला असता त्यांच्याकडून वर कॅन्सलेशन फी मागण्यात आली. एजन्सीने या तरु णांचे पासपोर्टही बळजबरी स्वत:च्या ताब्यात ठेवले आहेत. उलट, पोलिसात तक्र ार करून अटक करायला लावू, अशी धमकी या तरु णांना आसाम येथे देण्यात आली. कसेबसे येथून निघालेल्या या तरु णांनी आता नयानगर पोलीस ठाण्यात तक्र ार अर्ज दिला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर.के. जाधव यांनी चौकशी सुरू असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)