‘भानू फरसाण’चा खाद्यपदार्थ परवाना तपासणार , अग्निशमन दलही करणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 03:31 AM2017-12-19T03:31:00+5:302017-12-19T03:31:11+5:30

खाद्यपदार्थ बनविण्याच्या दुकानाला लागणारा परवाना व ना-हरकत प्रमाणपत्र ‘भानू फरसाण’ या दुकान मालकाने घेतले होते की नाही, याची आता तपासणी करण्यात येणार आहे. एल विभागाचे वैद्यकीय अधिकारी आणि मुंबई अग्निशमन दलाकडून ही बाब तपासण्यात येत आहे. या बाबींची पूर्तता केली नसल्यास चौकशी करून संबंधित अधिकारी वर्गावर कारवाई करण्यात येणार आहे.

 To check the food license of 'Bhanu Farsan', the fire brigade will investigate the matter | ‘भानू फरसाण’चा खाद्यपदार्थ परवाना तपासणार , अग्निशमन दलही करणार चौकशी

‘भानू फरसाण’चा खाद्यपदार्थ परवाना तपासणार , अग्निशमन दलही करणार चौकशी

Next

मुंबई : खाद्यपदार्थ बनविण्याच्या दुकानाला लागणारा परवाना व ना-हरकत प्रमाणपत्र ‘भानू फरसाण’ या दुकान मालकाने घेतले होते की नाही, याची आता तपासणी करण्यात येणार आहे. एल विभागाचे वैद्यकीय अधिकारी आणि मुंबई अग्निशमन दलाकडून ही बाब तपासण्यात येत आहे. या बाबींची पूर्तता केली नसल्यास चौकशी करून संबंधित अधिकारी वर्गावर कारवाई करण्यात येणार आहे.
आगीची मुंबई अग्निशमन दलाकडून स्वतंत्र चौकशी करण्यात येईल. दुकानातील पोटमाळा अनधिकृत असल्याचे आढळल्यास, जबाबदार अधिकारी वर्गावर कारवाई करण्यात येणार आहे.
खाद्यपदार्थांना आग-
आग इलेक्ट्रिक वायरिंगच्या ठिकाणी आटोक्यात आणण्यात आली होती. दुकानात मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ होते. ६० बाय ३०च्या या दुकानाला आगीने वेढले होते. आगीच्या तीव्रतेमुळे दुकान कोसळले. अग्निशमन दलाने १२ कामगारांना बाहेर काढत राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
नक्की काय घडले...
4.16 वाजता पहाटे दुकानाला आग लागल्याची
माहिती मुंबई महापालिका
नियंत्रण कक्षाला पोलीस नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झाली.
4.17वाजता ही माहिती अग्निशमन नियंत्रण कक्षास देण्यात आली.
4.18वाजता फरसाण दुकानास आग असून, यामध्ये आठ ते नऊ माणसे अडकल्याचे सांगण्यात आले.
4.38वाजता आग विझल्याचा कॉल देण्यात आला. चार फायर इंजिन आणि चार टँकरच्या मदतीने आग विझविण्यात आली.
आगीची चौकशी होणार
उपायुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) आणि मुंबई अग्निशमन दलामार्फत या घटनेची चौकशी होणार आहे. यामध्ये कारखान्यासाठी आवश्यक सर्व परवानगी नसल्यास, तसेच पोटमाळा बेकायदा आढळल्यास संबंधित अधिकारी वर्गावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिला आहे.
रमेश भानुशालीला अटक-
साकीनाका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी रमेश भानुशाली यास अटक
करण्यात आली आहे.
दोन्ही भाऊ ठार
नईम मिर्झा आणि वसिम मिर्झा या दोन्ही भावांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. सहा महिन्यांपूर्वी हे दोघे या दुकानात कामाला लागले होते.
तातडीने उपचार : रुग्णालयात ८ वाजेपर्यंत १२ मृतदेह आणण्यात आले होते. जखमी अवस्थेत कोणीही दाखल झाले नाही. डॉक्टर व कर्मचारी वर्गाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जखमी अवस्थेत कोणी आल्यास, त्यावर तातडीने उपचार सुरू करण्याची तयारी होती, अशी माहिती राजावाडी रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
उडी मारली अन् ‘तो’ वाचला... फरसाणच्या दुकानामधील सिलिंडरच्या स्फोटाचा आवाज ऐकताच, १३ कामगारांपैकी अखिलेश रामकिशोर तिवारी या कामगाराने दुकानाच्या खिडकीतून खाली उडी मारली. खिडकीतून बाहेर पडलेल्या अखिलेशचा जीव वाचला खरा. मात्र, या दुर्घटनेत तो जखमी झाला आहे. त्याला पायाला फ्रॅक्चर झाले असून, त्याच्यावर
ट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.
धुरामुळे गुदमरून मृत्यू? : स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आग लागली, तेव्हा हे कर्मचारी जागे होते. आगीच्या धुरामुळे श्वास गुदरमून त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर, त्यांचे शरीर आगीत भाजले गेले, परंतु आता शवविच्छेदन अहवालानंतर खरे कारण समोर येईल.

Web Title:  To check the food license of 'Bhanu Farsan', the fire brigade will investigate the matter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.