पंढरपुरात अन्न व औषध विभागाकडून उपाहारगृहाची तपासणी

By admin | Published: July 15, 2016 09:10 PM2016-07-15T21:10:09+5:302016-07-15T21:10:09+5:30

पंढरपुरातील ८० कि.लो. खाण्याचे पदार्थ नष्ट करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त निलेश मसारे यांनी दिली.

Check-up for lunch at Pandharpur Department of Food and Drugs | पंढरपुरात अन्न व औषध विभागाकडून उपाहारगृहाची तपासणी

पंढरपुरात अन्न व औषध विभागाकडून उपाहारगृहाची तपासणी

Next

सचिन कांबळे/ऑनलाइन लोकमत

पंढरपूर, दि. 15 - आषाढी यात्रेसाठी आलेल्या भाविकांना चांगले अन्न मिळावे, भाविकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी व्यापाऱ्यांनी दुकानात चांगल्या प्रतिचा माल ठेवला का नाही, याची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन कामाला लागले असून पंढरपुरातील ८० कि.लो. खाण्याचे पदार्थ नष्ट करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त निलेश मसारे यांनी दिली.
पंढरपूर शहरातील सरगम चौकातील मार्केट यार्ड, मंदिर परिसर व स्टेशन रोड या परिसरातील समारे २० हॉटेल्स, उपहार गृह, मिठाई विक्रेते, इ. च्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमार्फत तपासण्या केल्या आहेत. यायेळी त्या ठिकाणी लाडु, जिलेबी, पुरी, वडे, भजे, बेदाणे, पेढे इ. अन्न पदार्थ उघड्यावर व अस्वच्छ वातावरणात विक्रसाठी साठविण्यात आल्याचे आढल्याने अप्पर जिल्हादंडाधिकारी सोलापूर यांच्या आदेशाने उपरोक्त अन्न पदार्थांचा ८० कि.लो. इतका साठा जप्त करुन नष्ट करण्यात आला आहे.
सर्व अन्न व्यावसायिकांनी विक्रीसाठी साठविलेले अन्न पदार्थ झाकुन आरोग्यकारी वातावरणातच विक्री करण्याचे अवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे पदावधीत अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त स.भा. नारागुडे यांनी केले आहे. ही कारवाई २० जूलै पर्यंत चालु राहणार आहे.

Web Title: Check-up for lunch at Pandharpur Department of Food and Drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.