Live: अखेर दहावीचा निकाल जाहीर, मार्कलिस्ट कुठे पाहता येणार? जाणून घ्या एकाच क्लिकवर...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 01:04 PM2023-06-02T13:04:44+5:302023-06-02T13:11:10+5:30
Check Maharashtra Board SSC Result 2023 : दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला. त्यामध्ये राज्याचा निकाल ९३.८३ टक्के एवढा लागला आहे.
राज्य शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा दि. २ ते २५ मार्च २०२३ दरम्यान पार पडली. राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, काेल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि काेकण या नऊ विभागीय मंडळातील २० हजार १० शाळांमधील १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली हाेती. त्यामध्ये ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ लाख ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश हाेता. याचा निकाल जाहीर झाला आहे.
दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला. त्यामध्ये राज्याचा निकाल ९३.८३ टक्के एवढा लागला आहे.
या संकेतस्थळावर पाहता येईल निकाल
३. https://ssc.mahresults.org.in
विद्यार्थ्यांना वरील अधिकृत संकेतस्थळावर दहावीचा निकाल पाहता येईल. विषयनिहाय किती गुण टक्के मिळाले आहेत हे पाहून गुणांची प्रिंट आउटदेखील घेता येईल.
Maharashtra Board SSC Result 2023: दहावीचा निकाल जाहीर! 93.83 टक्के, SSC लाही कोकण विभाग अव्वल
दहावीचा निकाल एक तास आधीच दिसला... कसा काय... वाचा...
SSC Result 2023:दहावीचा एक तास आधीच निकाल मिळू लागला, पण मंडळ म्हणतं अफवा...
- ठाणे: ठाणे जिल्ह्याचा निकाल ९३.६३ दहावीत ही मुलींची बाजी
- धुळे जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९२.२४ टक्के
- दहावीमध्ये जळगावचा निकाल ९३.५२ टक्के
- पश्चिम वऱ्हाडात दहावीच्या निकालात पुन्हा वाशिमची बाजी; बुलढाणा जिल्हा दुसऱ्या स्थानी : विभागाचा ९३.२२ टक्के निकाल
- दहावीत यवतमाळचा टक्का घसरला, जिल्ह्याचा निकाल ९१ टक्के
- नगर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९४.४८ टक्के, गतवर्षीपेक्षा २ टक्के घसरण
- अकोला : मुलांमुळे जिल्ह्याचा निकाल घसरला, एकूण निकाल ९३.६२: मुलांची टक्केवारी ९०.५५ तर मुलींची ९५. ८६ टक्के