तिकिटांचा परतावा चेकने
By admin | Published: December 24, 2016 05:25 AM2016-12-24T05:25:06+5:302016-12-24T05:25:06+5:30
नोटकल्लोळानंतर केंद्र सरकारने सर्वत्र कॅशलेस व्यवहार करण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी रेल्वेत
मुंबई : नोटकल्लोळानंतर केंद्र सरकारने सर्वत्र कॅशलेस व्यवहार करण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी रेल्वेत मेल-एक्स्प्रेसचे तिकीट काढण्यासाठी करण्यात आली. आता तिकीट रद्द करताना त्याचा मिळणारा परतावा चेकमध्ये देण्यात येत असून त्यासाठी दहा ते पंधरा दिवस लागत आहेत.
याबाबत पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक जी.सी. अग्रवाल यांनी तिकीट परताव्यातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले व ते लवकरच दूर केले जातील, असे आश्वासनही दिले. त्याचप्रमाणे कॅशलेस व्यवहारात लोकलचा पास काढणाऱ्या प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागत होता. यात सेवा कराचा अतिरिक्त भार सहन करावा लागत असल्याने अखेर रेल्वे मंत्रालयाने हा कर रद्द करण्याचा निर्णय घेतला. (प्रतिनिधी)