दहावीच्या पेपरची तपासणी हॉटेलमध्ये
By admin | Published: April 14, 2017 02:05 AM2017-04-14T02:05:39+5:302017-04-14T02:05:39+5:30
विलेपार्ले येथील एका हॉटेलमध्ये दहावीचे पेपर तपासतानाचा व्हिडीओ युवा सेनेच्या हाती लागला आहे. याविषयी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या
पनवेल : विलेपार्ले येथील एका हॉटेलमध्ये दहावीचे पेपर तपासतानाचा व्हिडीओ युवा सेनेच्या हाती लागला आहे. याविषयी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेनेने गुरुवारी वाशी येथील उच्च माध्यमिक मंडळाच्या कार्यालयात निवेदन दिले. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जगताप यांना निवेदन व सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतल्याची माहिती युवासेना रायगडचे सचिव रूपेश पाटील यांनी दिली.
दहावीच्या ५०० विद्यार्थ्यांचे पेपर गहाळ होण्याचा प्रकार ताजा असतानाच गुरुवारी शिक्षण सूचीचे उल्लंघन करून एक प्राध्यापक शालेय उत्तरपत्रिका विलेपार्ले येथील हॉटेल टीब्रेकमध्ये तपासात असतानाचे चित्रण युवासेनेच्या हाती लागले. युवा प्रमुख आदित्य ठाकरे, प्रदीप सावंत व नीलिम भुरके यांच्या सूचनेनुसार युवा सेनेने गुरु वारी १३ एप्रिल रोजी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी वाशी येथील बोर्डाचे कार्यालयात शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जगताप यांची भेट घेऊन संबंधित प्राध्यापकावर कठोर कारवाईची मागणी के ली आहे. या वेळी सचिव रूपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर विधानसभा अधिकारी मयूर ब्रीद, पनवेल उपविधानसभा अधिकारी नितीन मांडावे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
युवा सेनेने हॉटेलमध्ये प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासत असल्याबाबत निवेदन दिले आहे. त्यासोबत दिलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाईल असा प्रकार घडल्याचे निदर्शनास आल्यास फौजदारी गुन्हा त्या प्राध्यापकावर दाखल केला जाईल.
- डी.जी. जगताप,
अध्यक्ष, शिक्षण मंडळ.