नोटमोजणी मशीनची दर तीन महिन्यांनी तपासणी करा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सर्व बँकांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 02:13 PM2022-07-02T14:13:28+5:302022-07-02T14:13:58+5:30

नोटबंदीनंतर भारतीय चलनात नव्या नोटा जारी करण्यात आल्या. आधीच्या नोटांच्या तुलनेत या नव्या नोटांच्या दर्जामध्येही मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात आल्या. तसेच नव्या नोटांकरिता नोटा मोजण्याच्या मशीनमध्येही काही बदल करण्यात आले.

checking the note counting machine every three months, RBI instructs all banks | नोटमोजणी मशीनची दर तीन महिन्यांनी तपासणी करा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सर्व बँकांना निर्देश

नोटमोजणी मशीनची दर तीन महिन्यांनी तपासणी करा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सर्व बँकांना निर्देश

googlenewsNext

मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेत २०१६ नंतर आलेल्या सर्व चलनातील नोटांचा दर्जा उत्तम राहील याची दक्षता घेण्यासाठी बँकांतील नोटा मोजणी मशीनमध्ये काहीसे बदल झाले आहेत. त्यामुळे या मशीनची अचूकता आणि कार्यक्षमता यांची दर तीन महिन्यांनी तपासणी करण्याचे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांना दिले आहेत.

नोटबंदीनंतर भारतीय चलनात नव्या नोटा जारी करण्यात आल्या. आधीच्या नोटांच्या तुलनेत या नव्या नोटांच्या दर्जामध्येही मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात आल्या. तसेच नव्या नोटांकरिता नोटा मोजण्याच्या मशीनमध्येही काही बदल करण्यात आले. प्रामुख्याने नोटांची सत्यता पडताळतानाच त्या व्यवहारासाठी योग्य आहेत की नाही याची चाचपणी या मशीनमध्ये होते. 

मात्र, या नव्या नोटांमध्येदेखील बनावट नोटांचे प्रमाण वाढत आहे. तसेच खराब होण्याचेही प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मशीनची योग्य ती काळजी घेण्यात यावी आणि बँकेतून जाणारी किंवा येणारी प्रत्येक नोट काळजीपूर्वक तपासावी, असे निर्देश शिखर बँकेने दिले आहेत. 

दरम्यान, नव्या नोटा जेव्हा बाजारात आल्या तेव्हाच त्यावर कोणत्याही प्रकारे पेन अथवा पेन्सीलने केलेल्या खुणा नकोत अथवा काही लिहिलेले नको, असे असल्यास त्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत हे रिझर्व्ह बँकेने यापूर्वीच स्पष्ट केले होते.
 

Web Title: checking the note counting machine every three months, RBI instructs all banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.