चेकमेट दरोडय़ातील तिघांनी केला लुटीचा बनाव
By admin | Published: July 6, 2016 08:41 PM2016-07-06T20:41:16+5:302016-07-06T20:41:16+5:30
नाशिकच्या ओझरखेड डॅम ते वणीदरम्यान पाच ते सहा जणांच्या टोळीने लुटल्याचा बनाव ठाण्याच्या चेकमेट सव्र्हिसेस प्रा. लि. या कंपनीवरील दरोडयातील तिघांनी मंगळवारी रात्री केला.
ऑनलाइन लोकमत
ठाणे : नाशिकच्या ओझरखेड डॅम ते वणीदरम्यान पाच ते सहा जणांच्या टोळीने लुटल्याचा बनाव ठाण्याच्या चेकमेट सव्र्हिसेस प्रा. लि. या कंपनीवरील दरोडयातील तिघांनी मंगळवारी रात्री केला. स्वत:वर दगडाने मारहाण करून रस्त्यावरच मदतीसाठी त्यांनी याचना केली. वणी पोलिसांनी त्यांना नाशिकच्या शासकीय रुगणालयात दाखल केले. मात्र, तपासात त्यांचे हे बिंगही उलगडण्यात नाशिक पोलिसांना यश आले. किरण साळुंखे (36, रा. पवननगर, नाशिक), हरिभाऊ वाघ (43, दत्तनगर, सिंचोळा, नाशिक) आणि वरुण शिंदे अशी या कथित दरोडेखोरांची नावे आहेत.
ह्यचेकमेटह्ण या खासगी वित्त कंपनीवर नऊ कोटींचा दरोडा टाकल्यानंतर ठाणो पोलिसांनी आतार्पयत नऊ जणांना अटक केली असून त्यातील उर्वरित पाच ते सहा आरोपींचा माग गेल्या एक आठवडयापासून काढण्यात येत आहे. ओझर डॅम येथे मंगळवारी रात्री फिश आणि दारुची पार्टी करुन हे तिघेजण पायी जात होते
रात्री 8 वा. च्या सुमारास ओझरखेड डॅम येथून मद्यधुंद अवस्थेत जात असतांना त्यांनी ओमनीला थांबविले. वणी जायचे, असल्याचे सांगून ते गाडीत बसले. नशेतच असल्यामुळे गाडीमध्ये त्यांनी लुटीतील सुरस कथा एकमेकांना सांगितल्या. गाडीचा चालक आणि त्याच्या साथीदांरांना हे समजताच त्यांनी गाडी एका ओसाड जागी थांबविली. नंतर या जणांच्या टोळक्याने दगड आणि लाथा बुक्यांनी त्यांना जबर मारहाण करुन त्यांच्याकडील दीड ते दोन लाखांची रोकड लुटून आणि आपल्याला गाडीतून बाहेर फेकून या टोळक्याने पलायन केले.
नंतर सुमारे दोन अडीच तास त्यातील किरण आणि हरी हे दोघे कृष्णगाव येथील रस्त्यावर मदतीसाठी प्रत्येक वाहनाला हात करुन थांबवायचा प्रयत्न करीत होते. मात्र, कोणीही थांबले नाही. अखेर नाशिक ग्रामीणच्या वणी पोलीस ठाण्याची पेट्रोलिंग व्हॅन तिथून जात असतांना त्यांनाही त्यांनी मदतीसाठी हात केला. तेंव्हा उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांना त्यांनी हा प्रकार कथन केला. त्यांनीच 1क्8 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून रात्री 11.3 वा. च्या सुमारास नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल केले. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे.
त्यांच्यावर गुदरेला हा प्रसंग कितपत खरा आणि खोटा याची खातरजमा करण्यासाठी ठाण्यातून गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर आणि वणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत तारगे हे बुधवारी सकाळपासून प्रत्येक बाबींची खातरजमा करीत होते. अखेर लुटीमुळे पोलीस अटक करतील, आपल्याला मारही बसेल. तो वाचविण्यासाठीच त्यांनी ही नामी शक्कल लढविल्याचीही कबुली दिली. ठाणो पोलिसांना त्यांचा ताबा घेतला असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असेही एका वरीष्ठ अधिका:याने ह्यलोकमतह्णला सांगितले.(प्रतिनिधी)