राज्यभरातील आश्रमशाळांची होणार तपासणी
By admin | Published: November 12, 2016 03:38 AM2016-11-12T03:38:40+5:302016-11-12T03:38:40+5:30
पाळा आश्रमशाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर राज्य शासनाने राज्यभरातील तमाम आदिवासी आश्रमशाळांमधील सोयीसुविधांची स्थिती तपासणीचे
यवतमाळ : पाळा आश्रमशाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर राज्य शासनाने राज्यभरातील तमाम आदिवासी आश्रमशाळांमधील सोयीसुविधांची स्थिती तपासणीचे आदेश दिले आहेत. आदिवासी विकास खात्याच्या आदेशानुसार १५ नोव्हेंबरपासून शासकीय व अनुदानित अशा एक हजार ७५ आश्रमशाळांची खास महिलांच्या पथकांमार्फत तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर आठवडाभरात त्याचा अहवाल शासनाला सादर केला जाईल.
राज्यभरात अनुदानित ५४६ आश्रमशाळांत दोन लाख ५३ हजार, तर शासकीय ५२९ आश्रमशाळांत एक लाख ९३ हजार विद्यार्थी शिकत आहेत. महसूल, महाराष्ट्र विकास सेवा, पोलीस, आदिवासी विकास विभागातील महिला अधिकाऱ्यांची ही समिती असणार आहे. चार ते पाच महिलांची समिती स्थापन करून अहवाल सादर करण्यास दोन महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती त्यात असणार आहे. ही समिती प्रत्येक आश्रमशाळेतील विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहे.