गोव्याची भाकरी पाव महागणार
By admin | Published: July 23, 2016 07:00 PM2016-07-23T19:00:49+5:302016-07-23T19:00:49+5:30
गोव्याच्या दैनंदिन आहारातील भाकरी असलेला पाव येत्या 1 ऑगस्टपासून महागणार आहे. लोकांची तीव्र नापसंती असली तरीही ऑल गोवा बेकर्स असोसिएशनने हा निर्णय घेतलेला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
मडगाव (गोवा), दि. 23 - गोव्याच्या दैनंदिन आहारातील भाकरी असलेला पाव येत्या 1 ऑगस्टपासून महागणार आहे. लोकांची तीव्र नापसंती असली तरीही ऑल गोवा बेकर्स असोसिएशनने हा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी पावाचा दर चार रुपयांवर स्थिर ठेवण्याचे ठरविले आहे. सध्या गोव्यात काही ठिकाणी तीन तर काही ठिकाणी पाच रुपये असा पावाचा दर आहे. या संघटनेच्या शनिवारी मडगावात झालेल्या आमसभेत हा निर्णय घेतल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष आगापितो मिनेङिास यांनी दिली.
या संघटनेने आपल्या पावाचे दर चार रुपये ठरविलेले असतानाच दुस-या ऑल गोवा बेकर्स अॅण्ड कन्फेक्शनरीज असोसिएशन या संघटनेने पावाचे दर पाच रुपये असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. यापूर्वी मिनेङिास यांच्या संघटनेने पाव दरवाढीला विरोध करून तीन रुपयांतच पाव विकणो पसंत केले होते. याबाबत मिनेङिास म्हणाले, चार रुपयांत पाव विकणो पाववाल्यांना परवडण्यासारखे आहे. ग्राहकांवर अधिक बोजा पडू नये यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. गोव्यातील बहुतेक पाववाले या संघटनेचे सदस्य असून या संघटनेत फूट घालण्यासाठीच दुसरी संघटना स्थापन केली आहे.