चेंबूरचे सहा जण बुडाले
By Admin | Published: July 7, 2014 04:13 AM2014-07-07T04:13:49+5:302014-07-07T04:13:49+5:30
मुरूडच्या समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या नऊ पर्यटकांपैकी सहा जणांचा खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी दुपारी घडली.वृत्त कळताच चेंबूरच्या घाटला गावावर शोककळा पसरली.
मुरूड/मुंबई : मुरूडच्या समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या नऊ पर्यटकांपैकी सहा जणांचा खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी दुपारी घडली. हे वृत्त कळताच चेंबूरच्या घाटला गावावर शोककळा पसरली.
मुरूड येथील पार्वती लॉजमध्ये चेंबूर, घाटला वॉर्ड नं. १४७ येथे राहणारे १७ छोटे बांधकाम व्यावसायिक पर्यटनासाठी
आले होते. आज सकाळी ११ च्या सुमारास काही जण समुद्रात उतरले होते. पोहण्यास अयोग्य जागी ते नेमके पोहण्यास गेले. पोहता पोहता ते खोलगट भागात गेले. तिथे पाण्याचा अंदाज न आल्याने आठ जण बुडाले. इतरांनी आरडाओरडा केल्याने स्थानिक मच्छीमार त्यांच्या मदतीसाठी धावले. त्यांनी प्रयत्नांची शर्थ करून
डोळस, अनिल बानट व देवीदास पांचाळ यांना वाचविले.
मात्र इतर सहा जण खोल पाण्यात बुडाले. मृतांमध्ये विनोद देवनारायण आजाई (४०), दिनेश सखाराम पवार (४५), दिलीप रामचंद्र घोले (४५), संजय नारायण पांचाळ (४३), शंकर चव्हाण (४०) व रोहित छगनभाई झाला (५५) यांचा समावेश आहे. त्यांचे मृतदेह विच्छेदनासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात पाठविल्याचे सहायक पोलीस निरीक्षक शेख यांनी सांगितले.