आॅनलाईन विक्री विरोधात केमिस्टचा शुक्रवारी संप 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 09:00 PM2018-09-27T21:00:53+5:302018-09-27T21:11:23+5:30

औषधांची आॅनलाईन (ई फार्मसी) आणि पोर्टलच्या माध्यमातून होणाऱ्या विक्री विरोधात आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अँड ड्रगिस्टने (एआयओसीडी) शुक्रवारी (दि. १८) देशव्यापी संपाची हाक दिली आहे. 

Chemist strike on Friday against online sale | आॅनलाईन विक्री विरोधात केमिस्टचा शुक्रवारी संप 

आॅनलाईन विक्री विरोधात केमिस्टचा शुक्रवारी संप 

Next
ठळक मुद्देआॅनलाईन औषध विक्रीच्या धोरणाविरोधात केमिस्टच्या मनात अस्वस्थताजुन्या अथवा बनावट चिठ्ठीवर देखील औषधे देण्याचे प्रकार आॅनलाईन कंपन्या औषधांवर ५० ते ७० टक्के सवलत

पुणे : औषधांची आॅनलाईन (ई फार्मसी) आणि पोर्टलच्या माध्यमातून होणाऱ्या विक्री विरोधात आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अँड ड्रगिस्टने (एआयओसीडी) शुक्रवारी (दि. १८) देशव्यापी संपाची हाक दिली आहे. 
आॅनलाईन कंपन्या कायद्यात असलेल्या कोणत्याही जबाबदारीचे पालन न करताच औषधांची मागणी नोंदवित आहेत. गर्भपात किट (एमटीपी), सिल्डेनफिल, टॅडलफिल, कोडेन या सारखी गुंगी आणणारी औषधे देखील डॉक्टरांचा कोणताही सल्ला नसताना देण्यात येतात. काही औषधे स्त्री रोग अथवा मानसोपचार तज्ज्ञांच्या चिठ्ठीशिवाय देता येत नाहीत. अशी औषधे देखील आॅनलाईन उपलब्ध होत आहेत. जुन्या अथवा बनावट चिठ्ठीवर देखील औषधे देण्याचे प्रकार घडत आहेत. इतकेच काय तर अधिक कमिशनसाठी डॉक्टरांची बनावट ई चिठ्ठी तयार केली जाते.  
अनेक आॅनलाईन औषध विक्री करणाऱ्या कंपन्या प्रिंट अथवा इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या माध्यमातून जाहिरात करतात. कायद्याच्या कलम १८ (क) नुसार वैध परवान्याशिवाय कोणत्याही औषधाची विक्री, वितरण, प्रदर्शन यावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. ई फार्मसी, पोर्टल्स अथवा इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या औषधांच्या बेकायदेशीर विक्रीच्या अनेक घटना केंद्रसरकार, संबंधित मंत्री आणि राज्य अन्न औषध प्रशासनाला दाखवून दिल्या आहेत. मात्र, त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.केंद्र सरकारने औषधांच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांसाठी १६ टक्के आणि घाऊक व्यापाऱ्यांसाठी १० टक्के नफा मान्य केला आहे. आॅनलाईन कंपन्या औषधांवर ५० ते ७० टक्के सवलत देऊ करीत आहेत. त्यामुळे असमान स्पर्धा निर्माण होत आहे. म्हणूनच आॅनलाईन औषध विक्रीच्या धोरणाविरोधात केमिस्टच्या मनात अस्वस्थता पसरलेली असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. 

Web Title: Chemist strike on Friday against online sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.