‘शतरंज के खिलाडी’पासून ‘भविष्य’पर्यंत

By Admin | Published: November 17, 2015 01:19 AM2015-11-17T01:19:38+5:302015-11-17T01:19:38+5:30

सईद जाफरी यांचा जन्म ९ जानेवारी १९२९ रोजी पंजाबमधील मलेरकोटला शहरात सामन्य कुटुंबात झाला. त्यांनी शालेय शिक्षणानंतर मसुरी व अलाहाबादेत शिक्षण घेतले. त्यांचा कल सुरवातीपासूनच

From 'Chess player' to 'Future' | ‘शतरंज के खिलाडी’पासून ‘भविष्य’पर्यंत

‘शतरंज के खिलाडी’पासून ‘भविष्य’पर्यंत

googlenewsNext

मुंबई : सईद जाफरी यांचा जन्म ९ जानेवारी १९२९ रोजी पंजाबमधील मलेरकोटला शहरात सामन्य कुटुंबात झाला. त्यांनी शालेय शिक्षणानंतर मसुरी व अलाहाबादेत शिक्षण घेतले. त्यांचा कल सुरवातीपासूनच रंगभूमीकडे होता. नवी दिल्लीत येऊन त्यांनी आपला ‘युनिटी’ हा नाट्यगट सुरू केला. या गटात त्यांनी शेक्सपिअर आणि इतर मान्यवर इंग्रजी नाटककारांच्या कलाकृती सादर केल्या. सईद जाफरींनी कधी त्या नाटकांत मुख्य भूमिका साकारली नाही तर छोट्या भूमिका करून ते आपली अभिनयाची हौस भागवून घेत. नंतर ते लंडनला गेले. तेथे त्यांना मोठ्या नाट्यशाळेत शिष्यवृत्ती मिळाली. लंडननंतर ते याच क्षेत्रातील शिक्षणासाठी अमेरिकेलाही गेले. तेथे अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केल्यानंतर ते चित्रपटांकडे वळले.
सईद जाफरी यांचा चित्रपट क्षेत्रातील प्रवास ख्यातनाम दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या मदतीने सुरू झाला. रे यांनी ‘शतरंज के खिलाडी’ हा एकमेव हिंदी चित्रपट केला. त्यात जाफरी यांच्यासोबत संजीवकुमार होते. आपल्या अभिनयाची चुणूक त्यांनी संजीवकुमार यांना दाखविली. त्यानंतर ते रिचर्ड एटनबरो यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘गांधी’मुळे चर्चेत आले. ‘गांधी’मध्ये त्यांनी सरदार पटेल यांची भूमिका प्रभावीपणे साकारली होती. त्यांनी बॉलिवूड, लंडन आणि अमेरिकन चित्रपटांत कौशल्य सिद्ध केले.

प्रमुख चित्रपट : जाफरी यांनी जवळपास ८० चित्रपटांत भूमिका केल्या. त्यात इंदर कुमार यांचा ‘दिल’, सुभाष घई यांचा ‘रामलखन’, राजकपूर यांचा ‘हीना’ व ‘राम तेरी गंगा मैली’, शेखर कपूरचा ‘मासूम’, सई परांजपे यांचा ‘चष्मेबद्दूर’, यश चोपडा यांचा ‘मशाल’, रमेश सिप्पी यांचा ‘सागर’, राकेश रोशन यांचा ‘खुदगर्ज’, पंकज पराशर यांचा ‘चालबाज’, के. विश्वनाथ यांचा ‘ईश्वर’, राजकंवर यांचा ‘जान’ आणि ‘जुदाई’, डेव्हीड धवन यांचा ‘दिवाना मस्ताना’ हे प्रमुख चित्रपट. २००६ मध्ये त्यांचा शेवटचा चित्रपट ‘भविष्य’ प्रदर्शित झाला.

कौटुंबिक जीवन : जाफरी यांचे दोन विवाह झाले. १९५८ मध्ये ते मधुर जाफरी यांच्याशी विवाहबद्ध झाले. १९६५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. १९८० मध्ये त्यांनी जेनिफर हिच्याशी लग्न केले. याच वर्षी जेनिफरचे निधन झाले. तिच्या जाण्यामुळे सईद जाफरी खूपच एकाकी झाले. त्यांना मीरा, जिया व साकिया जाफरी या तीन मुली होत्या. साकिया जाफरी लंडनमध्ये रंगभूमीवर सक्रिय आहे.

जाफरी यांच्या निधनाने रंगभूमीसह हिंदी आणि इंग्रजी चित्रपटसृष्टीत अष्टपैलू अभिनयाचा ठसा उमटविणारा अभिनेता हरपला आहे. व्यावसायिक आणि कलात्मक अशा दोन्ही प्रकारच्या चित्रपटात त्यांनी अभिनयाचा ठसा उमटविला होता.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Web Title: From 'Chess player' to 'Future'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.