२ दिवसाच्या इडी कोठडीनंतर छगन भुजबळ पुन्हा कोर्टात
By admin | Published: March 17, 2016 04:13 PM2016-03-17T16:13:59+5:302016-03-17T16:13:59+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची २ दिवसांची सक्तवसुली संचनलनालयाची (ईडी) कोठडी आज संपली आहे. ईडीचे आधीकारी त्यांना घेऊन सेशन्स कोर्टात गेले आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.१७ - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची २ दिवसांची सक्तवसुली संचनलनालयाची (ईडी) कोठडी आज संपली आहे. ईडीचे आधीकारी त्यांना घेऊन सेशन्स कोर्टात गेले आहेत. आज कोर्टाकडून काय निर्णय घेण्यात योतो त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भुजबळांच्या कोठडीत वाढ करण्यात येते की जामीन मंजूर होतो हे कोर्टाच्या निकालांनंतरच समजेल. सुत्राच्या माहीतीनुसार त्यांच्या इडीच्या कोठडीत ३ ते ४ दिवसांनी वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी सत्र न्यायालयात हजर केलं असता त्यांना २ दिवसाची कोठडी सुनावण्यात आली होती.
आज (गुरवारी) छगन भुजबळ आणि त्यांचे पुतण्या समीर भुजबळ यांची साकाळी १०:३० ते २:३० पर्यंत तब्बल ४ तास एकत्र सक्तवसुली संचलनालयात (ईडी) चौकशी करण्यात आली. चौकशी पुर्ण झाल्यानंतर समीर भुजबळ यांची पुन्हा आर्थर रोड जेलमध्ये रवानगी करण्यात आली तर भुजबळांना सेशन कोर्टात नेहण्यात आले.
महाराष्ट्र सदन आणि इतर ११ प्रकरणी घोटाळा केल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने भुजबळांवर आरोपपत्र दाखल करून चौकशीसाठी समन्स बजावले होते. एकूण ८७० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी भुजबळांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सोमवारी ११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून त्यांना अटक करण्यात आली होती. छगन भुजबळ यांचे पुतणे समीर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, तर मुलगा आ. पंकज यांना १० फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्या दोघांचे पासपोर्टही ताब्यात घेण्यात आले आहेत.