छगन भुजबळ आणि समीर भुजबळांना २७ एप्रिलपर्यंत न्यायलयीन कोठडी

By admin | Published: April 13, 2016 02:22 PM2016-04-13T14:22:06+5:302016-04-13T14:22:06+5:30

छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या कोठडीत वाढ करत न्यायालयाने दोघांनाही 27 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

Chhagan Bhujbal and Sameer Bhujbal will get judicial custody till April 27 | छगन भुजबळ आणि समीर भुजबळांना २७ एप्रिलपर्यंत न्यायलयीन कोठडी

छगन भुजबळ आणि समीर भुजबळांना २७ एप्रिलपर्यंत न्यायलयीन कोठडी

Next
ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि, १३ - महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांनाही 27 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कोठडी संपत असल्याने आज त्यांना न्यायालयात हजर केले होते. 
 
महाराष्ट्र सदन आणि इतर ११ प्रकरणी घोटाळा केल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने भुजबळांवर आरोपपत्र दाखल करून चौकशीसाठी समन्स बजावले होते. एकूण ८७० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिका-यांनी भुजबळांची चौकशी करण्याची मागणी केली होती. १४ मार्चला ११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून भुजबळांना अटक करण्यात आली होती. 
 

 

Web Title: Chhagan Bhujbal and Sameer Bhujbal will get judicial custody till April 27

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.