“भाजपची सुज आता कमी होईल”; छगन भुजबळांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 15:36 IST2020-02-20T15:02:12+5:302020-02-20T15:36:15+5:30
भाजपमध्ये गेलेल्या अनेकांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चांगले संबध आहे

“भाजपची सुज आता कमी होईल”; छगन भुजबळांची टीका
मुंबई : भाजपमधील अनेक नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा दावा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. भाजपला खिंडार पडले की नाही हे सांगू शकत नाही, मात्र भाजपची सुज कमी होईल, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी ते बोलत होते.
यावेळी भुजबळ म्हणाले की, भाजपमध्ये गेलेल्या अनेकांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चांगले संबध आहे. यामधील अनेकांच्या पिढीतिल लोकांनी काँग्रेस सोबत काम केलं आहे. तर यातील अनेकांनी 20 वर्षांपासून अधिक काळ राष्ट्रवादीत घातली आहे. त्यामुळे त्यांना तिथेले वातावरण सहन होत नाही.
त्यांना वाटत आहे की, चला आता आपल्या लोकांच सरकार आलं आहे. त्यामुळे त्यांनी त्या दिशेन चर्चा सुरु केली असून, भाजपमध्ये गेलेले अनेक लोकं राष्ट्रवादीत परत येणार असल्याचे भुजबळ म्हणाले. तर यामुळे भाजपला भाजपला खिंडार पडले की नाही हे सांगू शकत नाही. मात्र भाजपची सुज कमी होईल, असेही ते म्हणाले.