Chhagan Bhujbal Sharad Pawar, NCP: "शरद पवार यांना वाढदिवसाची काही भेट द्यायची असेल तर..."; भुजबळांची कार्यकर्त्यांकडे खास मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 07:31 PM2022-12-11T19:31:03+5:302022-12-11T19:31:24+5:30

महापुरूषांबद्दल केल्या जाणाऱ्या वादग्रस्त विधानांवरही मांडलं रोखठोक मत

Chhagan Bhujbal demands NCP party workers must work hard for upcoming elections if they want to gift something to Sharad Pawar on his birthday | Chhagan Bhujbal Sharad Pawar, NCP: "शरद पवार यांना वाढदिवसाची काही भेट द्यायची असेल तर..."; भुजबळांची कार्यकर्त्यांकडे खास मागणी

Chhagan Bhujbal Sharad Pawar, NCP: "शरद पवार यांना वाढदिवसाची काही भेट द्यायची असेल तर..."; भुजबळांची कार्यकर्त्यांकडे खास मागणी

googlenewsNext

Chhagan Bhujbal Sharad Pawar, NCP: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उद्या (१२ डिसेंबर) वाढदिवस आहे. त्यांची इच्छाशक्ती आणि कार्यकर्त्यांवरील प्रेम आपण सर्वांनी शिर्डीच्या शिबिरात पाहिले आहे. आजारी असताना देखील त्यांनी शिबीराला उपस्थिती लावली होती. आगामी काळातील निवडणुकांच्या दृष्टीने आपल्याला तयार राहावे लागणार आहे. राज्यातील महापालिका किंवा जिल्हापरिषदांच्या निवडणुका कधीही घोषित होतील. त्यामुळे जर शरद पवार यांना वाढदिवसाची काही भेट द्यायची असेल तर निवडणुकींच्या माध्यमातून त्यांना बळ द्या," असे खास आवाहन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड आयोजित एक दिवसीय शिबिराला त्यांनी उपस्थिती लावली यावेळी ते बोलत होते.

"महापुरुषांची बदनामी महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात जो जो उभा राहील तो आपला आहे आणि त्यांच्या पाठीमागे उभे राहा. फुले शाहु आंबेडकरांच्या राज्यात वारंवार महापुरुषांचा अपमान होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करून वारंवार महाराष्ट्राला अपमानित करण्याचे काम यांचे चालू आहे. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांनी भीक मागितली असे विधान केले. मात्र त्यांना ठाऊक नसेल १८६९ साली टाटा उद्योग समूहाचा वार्षिक उलाढालीचा आकडा हा २० हजार होता. तर पूना कमर्शियल इन कॉन्ट्रॅक्टींग या कंपनीचा वार्षिक उलाढालीचा आकडा होता २१ हजार रुपये आणि या कंपनीचे सर्वेसर्वा होते महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा फुले स्वत: उद्योगपती होते मोठमोठी कामे ते करत असत. आणि त्यातून मिळालेल्या पैश्याने त्यांनी समाजसुधारणेचे काम केले. लोकमान्य टिळकांना एका खटल्यातून सोडवण्यासाठी रूपये १०,००० इतकी रक्कम महात्मा फुले यांनी दिली होती," असे भुजबळ म्हणाले.

"कर्मवीरांनी तर शिक्षणाच्या कामासाठी स्वत:च्या पत्नीचे दागिने विकले पण मुलांना शिकविले. राज्यातील प्रकल्प राज्याबाहेर जायला लागले आहेत. मागील सहा महिन्यांपासून राज्याच नकारात्मक वातावरण आहे. सुरुवातीच्या काळात दहीहंड्या फोडण्यात मग्न झालेल्या या सरकारने आता नवस फेडण्यासाठी दौरे सुरू केले आहे, अशा राज्यात कोणते उद्योगपती थांबतील?  केंद्र सरकारने सुरू केलेले, मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया हे सगळे प्रकल्प अयशस्वी ठरले त्यांनी आपला गाशा गुंडाळला आहे.महाराष्ट्रातून लाखो कोटी रुपयाचे प्रकल्प घेऊन महाराष्ट्राला काहीही दिले जात नाही," अशी खंतही भुजबळ यांनी व्यक्त केली.

Web Title: Chhagan Bhujbal demands NCP party workers must work hard for upcoming elections if they want to gift something to Sharad Pawar on his birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.