“प्रदेशाध्यक्षपद मला दिले तर मी काम करीन”; छगन भुजबळ यांनी सांगितली ‘मन की बात’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 02:24 PM2023-06-22T14:24:32+5:302023-06-22T14:25:11+5:30

NCP Chhagan Bhujbal News: जयंत पाटील ५ वर्षांपासून प्रदेशाध्यक्षपदावर आहेत. ३ वर्षांनंतर हे पद बदलण्याची तरतूद पक्षाच्या घटनेत आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.

chhagan bhujbal said i am ready to take responsibility of ncp state president post | “प्रदेशाध्यक्षपद मला दिले तर मी काम करीन”; छगन भुजबळ यांनी सांगितली ‘मन की बात’

“प्रदेशाध्यक्षपद मला दिले तर मी काम करीन”; छगन भुजबळ यांनी सांगितली ‘मन की बात’

googlenewsNext

NCP Chhagan Bhujbal News: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहेत. विरोधी पक्षनेतेपदावरून अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात वाद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असे विधान अजित पवार यांनी केले आहे. यानंतर अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पद दिले जाणार का, यावरून तर्क-वितर्क लढवले जात आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षपद मला दिले तर मी काम करीन, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना सूचक भाष्य केले होते. अजित पवार यांना संघटनात्मक पदावर संधी द्यायची की नाही संघटनात्मक निर्णय आहे. मला मनापासून आनंद हे की अजित पवार यांना संघटनेत काम करायची इच्छा आहे. यामुळे कार्यकर्ता केडरमध्ये उत्साह संचारलाय. अजित पवार यांना प्रदेशाध्यक्षपद द्यायचे की नाही हा संघटनात्मक पातळीवरचा निर्णय आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. यानंतर आता छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्ष पदाबाबत भाष्य केले आहे. 

प्रदेशाध्यक्षपद मला दिले तर मी काम करीन

पक्ष नेते पदावर एकसमाज व्यक्ती असेल तर प्रदेशाध्यक्ष पदावर दुसऱ्या समाजाची व्यक्ती असावी. विरोधी पक्ष नेते अजित पवार असल्याने प्रदेशाध्यक्ष पदी ओबीसी समाजाचे नेत्याला संधी द्यावी, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. तसेच जयंत पाटील हे मागील पाच वर्षांपासून प्रदेशाध्यक्षपदावर कार्यरत आहेत. प्रत्येकी तीन वर्षांनंतर प्रदेशाध्यक्ष हे पद बदलण्याची तरतूद पक्षाच्या घटनेत आहे. आमचा पक्ष जो आहे तो लोकशाहीने चालणार पक्ष आहे. त्यात प्रत्येक जण आपले मत व्यक्त करतात. मला फक्त प्रदेशाध्यक्ष चार महिनेच मिळाले. पूर्वी विधी मंडळ नेता एक समजाचा असेल तर दुसरे पद समजाचे जायचे त्यामुळे आपण ओबीसी म्हणतो. आता नुसते बोलून चालणार नाही. त्यामुळे ओबीसी समाज जोडू शकतो. मला दिले तर मी काम करीन, असे मोठे विधान छगन भुजबळ यांनी केले.

दरम्यान, भाजपने बावनकुळे ओबीसी अध्यक्ष केला. काँग्रेसने नाना पटोले अध्यक्ष ओबीसी आहे. संजय राऊतदेखील ओबीसी आहेत. आमच्या पक्षात ओबीसीला जबाबदारी दिली पाहिजे, असे छगन भुजबळ म्हणाले.


 

Web Title: chhagan bhujbal said i am ready to take responsibility of ncp state president post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.