धुळयात फटाके फोडून छगन भुजबळ यांच्या अटकेचा आनंद साजरा
By admin | Published: March 15, 2016 08:01 AM2016-03-15T08:01:00+5:302016-03-15T08:17:30+5:30
छगन भुजबळ यांच्या अटकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असतानाच दुस-या बाजूला भुजबळ यांच्या अटकेचा आंनदोत्सव साजरा करण्यात आला.
Next
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. १५ - राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या अटकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असतानाच दुस-या बाजूला भुजबळ यांच्या अटकेचा आंनदोत्सव साजरा करण्यात आला.
छगन भुजबळ यांच्या अटकेची बातमी येताच धुळयातील भाजप आमदार अनिल गोटे यांचे कार्यकर्ते, समर्थकांनी रस्त्यावर उतरुन फटाके फोडून आनंद साजरा केला. २००३-०४ साली राज्यात गाजलेल्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळयात अब्दुल करीम तेलगी बरोबर छगन भुजबळ आणि आमदार अनिल गोटे यांच्यावरही घोटाळयात सहभागी असल्याचे आरोप झाले होते.
जुलै २००३ मध्ये गोटे यांना अटक झाली ते चारवर्ष तुरुंगात होते. मात्र त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्याने त्यांची सुटका झाली. विधानसभेत गोटे धुळे शहराचे प्रतिनिधीत्व करतात. भाजपच्या तिकीटावर दुस-यांदा ते निवडून विधानसभेवर गेले आहेत.