छगन भुजबळांच्या मालमत्तेचे मुल्यांकन एसीबीकडून सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2016 04:33 PM2016-09-02T16:33:06+5:302016-09-02T16:33:06+5:30
महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) वतीने माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघातील मालमत्तेचे मुल्यांकन सुरु आहे
Next
>- ऑनलाइन लोकमत
येवला (नाशिक), दि. 2 - महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) वतीने माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघातील येवला-विंचूर चौफुलीवर असलेल्या जमिनीवर असलेल्या संपर्क कार्यालयाच्या मालमत्तेची मोजदाद करण्यासाठी शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता एसीबीचे तीन अधिकारी व स्थानिक सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सात अधिकार्यासह एकूण दहा अधिकार्याच्या पथकाने मुल्यांकनाचे काम सुरु केले. मुल्यांकनाचे काम इनकॅमेरा सुरु होते.
शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता एसीबीचे अधिकारी आवारे यांच्यासह तीन अधिकारी छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात आले. सुमारे तासभरानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास मुल्यांकनाच्या कामास सुरुवात झाली. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाच अधिकारी तर सरकारी पंच म्हणून पंचायत समतिीचे दोन अधिकारी तेथे उपस्थित होते अशी माहिती मिळाली आहे. येवला येथील भुजबळांचे निवासस्थान हे संपर्क कार्यालय नावाने ओळखले जाते. हे निवासस्थान पंकज भुजबळ यांच्या नावे असून यामध्ये दोन मजली असून त्यात तळमजल्यावर सहा खोल्या आहेत. त्यात एक मोठा हॉल आहे. तर वरच्या मजल्यावर एकुण सात खोल्या आहेत.
छायाचित्र - चेतन कोळस
दरम्यान छगन भुजबळ त्यांचे कुटुंबीय यांच्या विरोधात ज्ञात स्रोतापेक्षा जास्त अपसंपदा बाळगली असल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे म्हणून त्यांच्या नावावर व त्यांचे कुटुंबींयाच्या नावावर वा त्यांनी धारण केलेल्या कंपनींच्या नावावर ज्या काही स्थावर मालमत्ता आहे. त्यांचे मुल्यांकन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंत्यामार्फत सुरु केलेले आहे. त्यापैकी एक मालमत्ता येवल्यातील आहे. मुल्यांकनाची कार्यवाही चालू आहे त्याचा अहवाल आल्यावर सांगू अशी प्रतिक्रि या अधिकाऱ्यांनी दिली.ज्या ज्या काही मालमत्ता आहे त्या सगळ्यांचे मुल्यमापन करणार आहोत असे असिस्टंट पोलीस कमिशनर आवारे यांनी सांगितले.