छगन भुजबळ यांचे पहिले ट्विट कार्यकर्त्यांसाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2018 01:56 PM2018-05-20T13:56:40+5:302018-05-20T13:56:40+5:30
पहिलंवहिलं ट्वीट करत त्यांनी कार्यकर्त्यांशी आपण लवकरच संवाद साधणार असल्याचं म्हटलं आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची आज ट्विटरच्या मैदानात एंट्री झाली आहे. त्यांच्यावर उद्या लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. त्यापूर्वी त्यांनी ट्विटरवर एंट्री केली आहे. पहिलंवहिलं ट्वीट करत त्यांनी कार्यकर्त्यांशी आपण लवकरच संवाद साधणार असल्याचं म्हटलं आहे. माझ्या बांधवांनो आणि माता भगिनींनो,माझ्यावर विश्वास व्यक्त करून आपण मला नेहमीच साथ दिली,त्यामुळे मी आपला आभारी आहे,देशाच्या कानाकोपऱ्यातून आपण मला भेटण्यासाठी उत्सुक आहात,याची मला कल्पना आहे.माझ्यावरील वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतर मी आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधायला येणार आहे असे ट्वीट भुजबळांनी केलं आहे.
भुजबळ यांनी आपण लावकरच आपल्याशी संवाद साधणार आहे असे म्हटल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे तुमची आम्ही आतुरतेने वाट पाहत असल्याचे एका कार्यकर्त्याने म्हटले आहे. आपल्याला दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना असेही एकाने ट्वीट केले आहे. काही जणांनी भाजपा सरकारवर टीका केली आहे. आपल्या कणखर नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे. असे अव्हानही काही नेटीझन्सने केले आहे.
माझ्या बांधवांनो आणि माता भगिनींनो,माझ्यावर विश्वास व्यक्त करून आपण मला नेहमीच साथ दिली,त्यामुळे मी आपला आभारी आहे,देशाच्या कानाकोपऱ्यातून आपण मला भेटण्यासाठी उत्सुक आहात,याची मला कल्पना आहे.माझ्यावरील वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतर मी आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधायला येणार आहे pic.twitter.com/UohXzohGOl
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) May 20, 2018
साहेब आई तुळजाभवानि आपल्याला उत्तम आरोग्य व दिर्घ आयुष्य लाभो हिच प्रार्थना
— vaibhav Kishor Nagar (@vaibhavnagare88) May 20, 2018
साहेब फडणवीस सरकार कुचकामी ठरलय, खोटी आश्वासने देऊन निवडुन आल्यानंतर सत्तेचा दुरूपयोग चालु.. आपल्या कणखर नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे.
— ️🏁.. 🏎Rɑϲҽ3 σŋ тнҽ wα¥ (@being_samrat_) May 20, 2018
साहेब आम्ही सर्व कार्यकरतेआपली आतुरतेने वाट पाहत आहे.आई जंगदंबा आपल्याला दिर्घायुष्य लाभो.
— Sandeep Sonawane (@Sandeep38864940) May 20, 2018