छगन भुजबळ यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड
By admin | Published: March 16, 2016 07:49 PM2016-03-16T19:49:49+5:302016-03-16T19:49:49+5:30
महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या प्रकृती खालवली आहे. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याची माहीती समोर आली आहे.
Next
>ऑनलान लोकमत
मुंबई, दि. १६ - महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या प्रकृती खालवली आहे. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याची माहीती समोर आली आहे. अद्याप नेमके कारण समोर आले नाही. जे जे रुगणालयातील दोन डॉक्टर भुजबळ यांच्या तपासासाठी इडीच्या कार्यालयात पोहचले आहेत. त्यांच्या तपासानंतरच भुजबळ यांना काय झाले होते. कशाने अस्वस्थ वाटत होते हे समजेल. दोन दिवसापुर्वी त्यांना महाराष्ट्र सदन आणि इतर ११ प्रकरणी घोटाळा केल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने भुजबळांवर आरोपपत्र दाखल केले होते. एकूण ८७० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. काल कोर्टाने त्यांना २ दिवसाची इडी कोठडी सुनावली आहे.