धनंजय मुंडेंनी घेतली छगन भुजबळांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 06:25 AM2018-05-06T06:25:01+5:302018-05-06T06:25:01+5:30
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी, शनिवारी के.ई.एम. रुग्णालयात जाऊ न राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. भुजबळ सोमवारपासून पुन्हा सक्रिय होतील, असा विश्वास मुंडे यांनी या भेटीनंतर व्यक्त केला.
मुंबई - विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी, शनिवारी के.ई.एम. रुग्णालयात जाऊ न राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. भुजबळ सोमवारपासून पुन्हा सक्रिय होतील, असा विश्वास मुंडे यांनी या भेटीनंतर व्यक्त केला.
छगन भुजबळ यांना शुक्रवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला असला, तरी ते सध्या रुग्णालयात आहे. मुंडे यांनी त्यांची तेथेच भेट घेतली. त्यांच्यासोबत आ. अमरसिंह पंडित, आ. जयंत जाधव व अन्य पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते होते. भुजबळ यांच्या डिस्चार्जबाबत आपण डॉक्टरांशी चर्चा केली, असे सांगून, मुंडे म्हणाले की, आणखी दोन दिवस त्यांना रुग्णालयातच राहावे लागणार असून, सोमवारपासून ते सक्रिय होतील, असा मला विश्वास आहे. न्यायदेवतेने भुजबळ यांना न्याय दिल्याबद्दल मुंडे यांनी समाधान व आनंद व्यक्त केला.