सप्तश्रृंगगडावर चैत्रोत्सवास प्रारंभ

By admin | Published: April 15, 2016 05:51 PM2016-04-15T17:51:36+5:302016-04-15T17:51:36+5:30

सप्तश्रृंग गडावर यात्रोत्सवास प्रारंभ झाला रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत होणार्या यात्रोत्सवासाठी विविध प्रकारचे नियोजन आखण्यात आले आहे

Chhatrasvas started on Saptashrangad | सप्तश्रृंगगडावर चैत्रोत्सवास प्रारंभ

सप्तश्रृंगगडावर चैत्रोत्सवास प्रारंभ

Next

ऑनलाइन लोकमत

वणी (नाशिक), दि. १५ - सप्तशृंगगडावर चैत्र यात्रोत्सवास भावभक्ती पूर्ण वातावरणात प्रारंभ झाला असुन न्यासाचे विश्वस्थ राजेंद्र सुर्यवंशी यांचे हस्ते विशेष महापुजा सपत्नीक पार पाडण्यात आली साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धपीठ असणार्या सप्तश्रृंग गडावर यात्रोत्सवास प्रारंभ झाला रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत होणार्या यात्रोत्सवासाठी विविध प्रकारचे नियोजन आखण्यात आले आहे. उत्सव काळात २४ तास मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार असुन ६५ सीसीटिव्ही कॅमेरे, ३ ठिकाणी मार्गदर्शन कक्ष, ९५ सुरक्षारक्षक, ५ बंदुकधारी सुरक्षारक्षक महाराष्ट्र पोलीस, व राज्य गृहरक्षक दल कार्यान्वित करण्यात आले आहे.

Web Title: Chhatrasvas started on Saptashrangad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.