छत्तीसगडचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ बनले महाराष्ट्रात डॉक्टर

By admin | Published: January 2, 2015 12:47 AM2015-01-02T00:47:59+5:302015-01-02T00:47:59+5:30

गडचिरोली या नक्षलग्रस्त आदिवासी जिल्ह्यात शासकीय सेवेचे वैद्यकीय अधिकारी येऊन सेवा बजावत नसल्याने छत्तीसगड राज्यातील प्रयोगशाळा तंत्रज्ञांचा वैद्यकीय व्यवसाय जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात

Chhattisgarh's laboratory technician became a doctor in Maharashtra | छत्तीसगडचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ बनले महाराष्ट्रात डॉक्टर

छत्तीसगडचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ बनले महाराष्ट्रात डॉक्टर

Next

आरोग्य विभागाचे दुर्लक्ष : एटापल्ली तालुक्याच्या शेकडो गावात बहरला व्यवसाय
ए. आर. खान - अहेरी (गडचिरोली)
गडचिरोली या नक्षलग्रस्त आदिवासी जिल्ह्यात शासकीय सेवेचे वैद्यकीय अधिकारी येऊन सेवा बजावत नसल्याने छत्तीसगड राज्यातील प्रयोगशाळा तंत्रज्ञांचा वैद्यकीय व्यवसाय जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात फोफावत चालला आहे. मात्र महाराष्ट्र शासनाची आरोग्यसेवा याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ आहे. त्यामुळे दुर्गम व अतिदुर्गम भागातील रूग्णांच्या जीवाशी सध्या खेळ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून एटापल्ली, भामरागड, कोरची, सिरोंचा या तालुक्याच्या सीमा येतात. हा गडचिरोली जिल्ह्याचा नक्षलीदृष्ट्या संवेदनशील भाग आहे. या भागात शासनाच्या आरोग्यसेवेशिवाय दुसरी आरोग्य सेवा नाही. शासनाच्या आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. तर काही दुर्गम गावातील लोक आरोग्य केंद्रापर्यंत दळणवळणाची साधने नसल्याने पोहोचत नाही. अशा परिस्थितीत छत्तीसगड राज्यात प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदावर असलेले अनेक तरूण गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली, कोरची, सिरोंचा आदी भागातील दुर्गम गावांमध्ये जाऊन वैद्यकीय व्यवसाय विनापरवानगी करीत आहे. यांच्याकडे वैद्यकीय शास्त्राची कोणतीही डिग्री नसल्याचे दिसून येत असतानाही या बोगस डॉक्टरांचा धंदा दुर्गम भागात फोफावत चालला आहे.
एटापल्ली तालुक्याच्या गट्टा परिसरातील ताडगुडा येथे ५० ते ६० लोकसंख्येच्या गावात छत्तीसगडचा प्रयोगशाळा तंत्रज्ञ घरपोच आरोग्यसेवा देण्याचे काम करीत असल्याचे दिसून आले व मनमानी फी आकारून गरीब आदिवासींचे आर्थिक शोषण करीत आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला या गंभीर प्रकाराची साधी माहितीही नाही. जिल्ह्यात बोगस डॉक्टर नसल्याचा दावा हा विभाग सातत्याने करीत आहे. दुर्गम भागात वैद्यकीय अधिकारी राहत नसल्याने नाईलाजास्तव नक्षलग्रस्त भागातील लोकांना आरोग्य तपासणी छत्तीसगडच्या बोगस डॉक्टरांकडून करावी लागत आहे. त्यामुळे अनेक लोकांचे चुकीच्या उपचारामुळे जीवही जाण्याच्या घटना घडलेल्या आहे. यांच्या हातून उपचार झालेले सिरिअस पेशन्टनंतर अहेरी किंवा गडचिरोली येथे आणले जातात, असे दिसून येते.

Web Title: Chhattisgarh's laboratory technician became a doctor in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.