मेळघाटच्या अवैध वृक्षतोडीवर मुख्य वनसंरक्षक संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 01:39 AM2018-12-01T01:39:09+5:302018-12-01T01:39:24+5:30

वनविभागाचे फिरते पथक नावालाच : दोन वर्षांत एकही कारवाई नाही; धरपकड सुरू, वनतस्कर मात्र मोकळेच

Chief conservator of the Melghat on the illegal tree trunk | मेळघाटच्या अवैध वृक्षतोडीवर मुख्य वनसंरक्षक संतापले

मेळघाटच्या अवैध वृक्षतोडीवर मुख्य वनसंरक्षक संतापले

googlenewsNext

परतवाडा (अमरावती) : मेळघाटातील अवैध वृक्षतोडीवर मुख्य वनसंरक्षकांनी अधिनस्थ वनअधिकाऱ्यांपुढे आपला संताप व्यक्त केला. २६ नोव्हेंबरच्या बैठकीत वनअधिकाºयांना त्यांनी सक्त निर्देश दिले. तरीदेखील मोठे वनतस्कर मोकळे आहेत.


अंजनगाव-दहिगाव रेंजचे वनपरिक्षेत्र अधिकारी ओ.बी. पिंदोर, वनपाल सुधीर हाते, वनरक्षक विजय चव्हाण, राजू भाकरे, विजय गुरलेरीकर यांच्यासह वनगस्तीवर असताना त्यांनी वृक्षतोड करणारा आरोपी मोतीलाल कास्देकर यास ताब्यात घेतले. काकादरी जंगलात २९ नोव्हेंबरला १०० ते १२० गोलाईची मोठी सागाची झाडे तोडून आरोपी त्याची चरपट तयार करीत होता. आरोपीला साग चरपटासह अटक करण्यात आली आहे.


चिखलदरा वर्तुळातील आमझरीमधील गाविलगड किल्ला रोडवरील रिसॉर्ड स्ट्रॉबेरी येथे सर्च वॉरंटद्वारे चार नग सागवान पल्ले व पाच नगर सागवान चरपट वनअधिकारी व कर्मचाºयांनी जप्त केल्यात. यात रिसॉर्ड चंद्रभान दुरतकर यास आरोपी करून अटक केली. २७ नोव्हेंबरला अटक करून २८ नोव्हेंबरला न्यायालयापुढे हजर करून एक दिवसाचा आरोपीचा पीसीआर मिळविला. पीसीआरमधील चौकशीत दिलेल्या माहितीवरून कामापूर येथे २९ नोव्हेंबरला धाड टाकून आरोपी मन्नू राजू अखंडे यास वनअधिकाºयांनी अटक केली. मन्नुच्या घरातील लहान-मोठे सागाचे २६ नग जप्त करून ३ डिसेंबरपर्यंत त्याचा पीसीआर मिळविला. चिखलदरा वनपरिक्षेत्र अधिकारी डी.के. मुनेश्वर, सहवनपाल सी.बी. खेरडे, वनरक्षक पी.पी. चौधरी, पी.एस. तळखंडकर, पी.सी. साबळे, बंडू गवळी, वाहनचालक रामराव गवई, वनमजूर अंबºया निखाळे, शालिकराम बेलसरे व कासदेकर यांनी मिळून ही कारवाई केली.


फिरते पथक
वनविभागांतर्ग$त स्वतंत्र फिरते पथक कार्यरत आहे. पूर्व मेळघाटवनविभागात याकरिता स्वतंत्र वनपरिक्षेत्र अधिकारी तैनात आहेत. या वनपरिक्षेत्र अधिकाºयांकडे वनपाल, वनरक्षक व मागणी केल्यावरून एक पोलीस शिपाई तैनात असतो. गस्तीकरिता वनगुन्हे उजेडात आणण्याकरिता वनतस्करांवर व अवैध वृक्षतोडीवर लक्ष पुरविण्याकरिता त्यांना एक स्वतंत्र वाहन देण्यात आले आहे. विभागांतर्ग$त त्यांना कुठेही फिरण्याचा, कारवाई करण्याचा अधिकार असला तरी हे फिरते पथक नावालाच उरले आहे. मागील दोन वर्षात एकही कारवाई या फिरत्या पथकाने केली नाही. एकही वनतस्करी उजेडात आणली नाही. कुठल्याही वनतस्करावर कारवाई केलेली नाही. अमरावती प्रादेशिक वनविभागाच्या फिरत्या पथकाचीही हीच स्थिती आहे.


फर्निचर चर्चेत
दिवाळीच्या तेवढ्यात नागपूर येथील एका वरिष्ठ वनअधिकाºयाकडे परतवाडा येथून २ लाख ७५ हजाराचे सागवान फर्निचर पाठविल्या गेले. यात मुख्य भूमिका सहाय्यक वनसंरक्षक सानप यांनी वठविली. या फर्निचरच्या अनुषंगाने २ लाख ७५ हजारांपैकी केवळ ७५ हजार संबंधित दुकानदाराला दिल्या गेले असून उर्वरीत रक्कम बाकी आहे. उर्वरीत रक्कमेच्या अनुषंगाने त्या दुकानदाराला लाकूड पुरविण्याची हमी देण्यात आली आहे. लाकूड पुरविण्याची हमी देणारे आता हे लाकूड कसे पुरवितात, याकडे त्या दुकानदारासह सर्वांनाच लक्ष लागले आहे. अवैध वृक्षतोडीच्या अनुषंगाने हे फर्निचर चांगलेच चर्चेत आले आहे.

Web Title: Chief conservator of the Melghat on the illegal tree trunk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.