शिवस्मारकासाठी 3600 कोटींच्या प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांकडून मान्यता

By admin | Published: October 26, 2016 09:31 AM2016-10-26T09:31:17+5:302016-10-26T12:49:16+5:30

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी 3 हजार 600 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे.

Chief Minister approves project worth Rs. 3600 crores for Shiv Sena | शिवस्मारकासाठी 3600 कोटींच्या प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांकडून मान्यता

शिवस्मारकासाठी 3600 कोटींच्या प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांकडून मान्यता

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 26 - आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा एकदा अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा मुद्दा चर्चेत आला आहे. याच पार्श्वभूमीवर अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी 3 हजार 600 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. आचारसंहितेतही निवडणूक आयोगाच्या परवानगीने निधी मंजूर केला जाईल, अशी माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली.
 
दरम्यान, निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाल्यास टेंडर प्रक्रिया पूर्ण करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचे उद्धाटन करण्यात येईल, असे विनायक मेटे यांनी सांगितले आहे. शिवस्मारक प्रकल्पासाठी लागणार निधी राज्य सरकारकडून उपलब्ध केला जाणार असून, यातील काही प्रमाणात निधी केंद्र सरकारकडून मिळणार असल्याचेही मेटेंनी सांगितले आहे.
 
दरम्यान, या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत होणार आहे. 2019पर्यंत पहिला टप्पा पूर्ण होईल. यामध्ये शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा समावेश असेल, तर दुस-या टप्प्यात आर्ट गॅलरी, संग्रहालय, गड-किल्ल्यांचा देखावा, शिवचरित्र अशा अनेक बाबींचा समावेश असणार आहे. 
 

Web Title: Chief Minister approves project worth Rs. 3600 crores for Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.