दिल्लीहून परतताच मुख्यमंत्र्यांनी बोलवली तातडीची बैठक
By admin | Published: March 17, 2017 10:10 PM2017-03-17T22:10:28+5:302017-03-17T22:12:16+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री 10.30 वाजता वर्षा निवासस्थानी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलवली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17- उद्या सादर होणा-या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री 10.30 वाजता वर्षा निवासस्थानी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलवली आहे. दिल्लीवरुन परतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लगेचच ही बैठक बोलवल्याने विविध चर्चांना सुरु झाल्या आहेत.
शेतक-यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेतली. या बैठकीत कर्जमाफीच्या मुद्यावर कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही. अवघ्या अर्ध्या तासाच्या आत ही बैठक आटोपली.
शेतक-यांच्या हितासाठी केंद्र सरकारने योजना आणावी. शेती क्षेत्रात गुंतवणूक वेळेची गरज आहे. राज्य सरकारही आपला वाटा उचलायला तयार आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतक-याच्या कल्याणासाठी महाराष्ट्र सरकारचे जे प्रयत्न सुरु आहेत त्याला संपूर्ण पाठिंबा देण्याचे तसेच आमच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचा दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.