"मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला, शेतकऱ्यांना दिलेले पॅकेज फसवे!"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 07:26 PM2020-10-23T19:26:33+5:302020-10-23T19:40:57+5:30

Devendra Fadnavis : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपला शब्द फिरवत आज जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे आहे, असे म्हणत ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.

"The Chief Minister changed the word, the package given to the farmers is fraudulent!" | "मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला, शेतकऱ्यांना दिलेले पॅकेज फसवे!"

"मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला, शेतकऱ्यांना दिलेले पॅकेज फसवे!"

Next
ठळक मुद्दे'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द फिरवत आज जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे आहे.'' यापूर्वी 25,000 आणि 50,000 रूपये हेक्टरी मदतीची मागणी त्यांनीच केली होती. फळबागांसाठी तर एक लाखांपर्यंत मदत त्यांनी मागितली होती. '

मुंबई : पूर आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. दरम्यान, या घोषणेवरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपला शब्द फिरवत आज जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे आहे, असे म्हणत ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द फिरवत आज जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे आहे. बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना त्यांनी निव्वळ बहाणे शोधले आहेत. शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यापूर्वी 25,000 आणि 50,000 रूपये हेक्टरी मदतीची मागणी त्यांनीच केली होती. फळबागांसाठी तर एक लाखांपर्यंत मदत त्यांनी मागितली होती. पण, आता ती मदत द्यायची नाही, म्हणून केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करीत आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

याचबरोबर, नियमित अर्थसंकल्पातील आकड्यांनाच पॅकेज भासवून मलमपट्टी केल्याचा आव सरकार आणू पाहत आहे. परंतु, केवळ देखावा निर्माण करून शेतकर्‍यांना अजिबात मदत मिळणार नाही. बहाणेबाजी करून महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची घोर निराशा आणि फसवणूक केली आहे, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याशिवाय, किमान शेतकर्‍यांच्या बाबतीत तरी आणि झालेल्या नुकसानीची तीव्रता पाहता अशा काल्पनिक आकड्यांची धूळफेक मुख्यमंत्री करतील, असे वाटले नव्हते. हा शेतकर्‍यांसोबत झालेला मोठा विश्वासघात आहे. निसर्गाने तर अन्याय केलाच आहे, आता सरकारही सूड घेत आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Web Title: "The Chief Minister changed the word, the package given to the farmers is fraudulent!"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.