मुख्यमंत्री चव्हाण आणि नायडूंची ‘समझोता एक्स्प्रेस’
By admin | Published: August 27, 2014 04:30 AM2014-08-27T04:30:44+5:302014-08-27T04:30:44+5:30
केंद्र सरकार कॉँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांशी करीत असलेल्या भेदभावाबाबत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना मंगळवारी मात्र दोन्ही बाजूंकडून हातात हात घेऊन एक साथ काम करण्याची भूमिका मांडण्यात आली
मुंबई : केंद्र सरकार कॉँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांशी करीत असलेल्या भेदभावाबाबत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना मंगळवारी मात्र दोन्ही बाजूंकडून हातात हात घेऊन एक साथ काम करण्याची भूमिका मांडण्यात आली. पक्षीय राजकारण हे निवडणुकीपुरते राहिले पाहिजे. राज्य व केंद्राने एकत्रितपणे विकासाचे प्रकल्प राबविण्याची गरज आहे, गैरसमज दूर करण्यास आम्ही प्रयत्नशील राहू, अशी समंजस भूमिका केंद्रीयमंत्री व्यंकय्या नायडू यांनी मांडली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मुंबई व महाराष्ट्रातील विकासाबाबतच्या केंद्राकडील प्रलंबित प्रस्तावांना मंजुरी द्यावी, अशी मागणी केली.
मुख्यमंत्री चव्हाण व नायडू यांच्यातील या ‘समझोता एक्स्प्रेस’चे निमित्त होते मेट्रो-३चे भूमिपूजन सोहळ्याचे. अंधेरीत झालेल्या या कार्यक्रमाला बोलाविल्याबद्दल नायडूंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. चव्हाण यांनीही या ठिकाणी आल्याबद्दल नायडंूना धन्यवाद दिले. कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दोघा नेत्यांनी विकासकामामध्ये आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नसल्याची ग्वाही दिली.