मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली - राणे

By admin | Published: October 18, 2016 04:59 PM2016-10-18T16:59:20+5:302016-10-18T16:59:20+5:30

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे त्यांमुळे त्यांनी राजीनामा दयावा अशी मागणी काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केली आहे. ते मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

Chief Minister cheated Maratha community - Rane | मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली - राणे

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली - राणे

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - मराठा आरक्षणाबाबत सरकारने कोर्टात वेळ मागितला, मात्र मुख्यमंत्री म्हणाले की वेळ मागितला नाही. पण कोर्टाच्या आदेशाच्या प्रतमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटं बोलत असल्याचं उघड होत आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे त्यांमुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केली आहे. ते मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

नाराण राणे यांनी मराठा आरक्षणावार मुख्यमंत्र्याना टार्गेट केलं आहे. ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असतं, तर सरकारने नोव्हेंबर २०१४ पासून आजपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर का केलं नाही?, आपलं पद टिकवण्यासाठी मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत. आगामी अधिवेशनात मुख्यमंत्र्याविरोधात आम्ही अविश्वास ठराव आणणार आहे. भाजपामध्ये गुंडाना प्रवेश दिला जातोय. मुख्यमंत्री १४ भ्रष्ट मंत्र्यासंह सरकार चालवत आहेत. एकाद्या मंत्र्यावर आरोप झाले की मुख्यमंत्री त्यांना क्लिनचीट देतात.

आणखी वाचा - 

मराठा आरक्षणावरुन उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले नाहीत - मुख्यमंत्री

मराठा आरक्षण सुनावणी पुन्हा लांबली

मराठा आरक्षणासंदर्भात सरकारचं प्रतिज्ञापत्र तयार

 

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून फूट पाडण्याचा प्रयत्न

तळेगाव मध्ये झालेल्या हिंसाचारास पालकमंत्री गिरीश महाजन जबाबदार असल्याचा आरोप यावेळी बोलताना नारायण राणे यांनी केला.

 

Web Title: Chief Minister cheated Maratha community - Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.