चेंबूर भूखंड प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे
By admin | Published: September 21, 2016 02:44 AM2016-09-21T02:44:44+5:302016-09-21T02:44:44+5:30
शिवसेनेचे अणुशक्तीनगर विधानसभेचे आमदार तुकाराम काते यांनी निवेदनाद्वारे विकासकावर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मुंबई : चेंबूर येथील भूखंड बळकावण्याच्या विरोधात शिवसेनेचे अणुशक्तीनगर विधानसभेचे आमदार तुकाराम काते यांनी निवेदनाद्वारे विकासकावर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
चेंबूरच्या वाडीवली येथील सर्व्हे क्रमांक ७/१ मधील प्लॉट क्रमांक ११० व १११ या मोकळ्या भूखंडावर रविंदर निगम व योगिंदर निगम यांची मालकी आहे. हा भूखंड बेकायदा बळकावण्याचा सबरी कंपनी प्रयत्न करत आहे. अनेक दिवसांपासून या ठिकाणी गुंड प्रवृतीची माणसे वावरत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार आमदार काते यांनी आपल्या निवेदनात केली आहे. निगम बंधू यांनीही विकासकाविरोधात तक्रार केली आहे. (प्रतिनिधी)