मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लीडरशिप समिटमध्ये तरुणाईशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 01:20 AM2017-09-24T01:20:23+5:302017-09-24T01:20:32+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी हैदराबाद येथील प्रतिष्ठेच्या इंडियन स्कूल आॅफ बिझिनेसतर्फे आयोजित लीडरशिप समिटमध्ये तरुणाईशी संवाद साधला.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी हैदराबाद येथील प्रतिष्ठेच्या इंडियन स्कूल आॅफ बिझिनेसतर्फे आयोजित लीडरशिप समिटमध्ये तरुणाईशी संवाद साधला. भारत हा सर्वाधिक तरुण लोकसंख्येचा देश असून जगाला कुशल मनुष्यबळ पुरविण्याची क्षमता भारतात आहे. तरुणाईने निष्ठेने प्रयत्न केल्यास भारत निश्चितच महासत्ता बनू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जागतिक पातळीवर भारतीय नेतृत्वाची उपेक्षा होण्याचे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय क्षेत्राची व्याख्याच बदलून टाकली आहे. प्रभावी नेतृत्वासोबतच नागरिकांना प्रेरणा देऊन परिवर्तनाची प्रक्रिया गतिमान करण्यात मोदी यांनी मोठी भूमिका बजावली आहे, असे फडणवीस म्हणाले. ‘ईझ आॅफ डुर्इंग बिझिनेस’ अंतर्गत महाराष्ट्र शासनाने उचललेली पावले, त्यातून घडत असलेल्या परिवर्तनाविषयी त्यांनी माहिती दिली.