Video - जे मुघलांना जमलं नाही ते मुख्यमंत्र्यांनी केलं; जयंत पाटलांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 03:12 PM2019-09-06T15:12:49+5:302019-09-06T15:35:48+5:30
आता महाराजांचे गडकिल्ले पर्यटनाच्या नावाखाली लग्न समारंभ आणि तत्सम पार्ट्यांना देण्याचा घाट सरकारने घातला आहे.
पुणे : महाराष्ट्रातील गडकिल्ले पर्यटन वाढण्यासाठी हॉटेल व्यावसायिक तसेच लग्नसमारंभासाठी देण्याचा घाट महाराष्ट्र पर्यटन विभागाने घातला आहे. या निर्णयावर आता सगळीकडून टीका होत असून जे मुघलांना जमलं नाही ते भाजप आणि मुख्यमंत्रांनी केल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक पार पडत आहे. या बैठकीला शरद पवार, छगन भुजबळ, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, फौजिया खान, रुपाली चाकणकर आदी उपस्तिथ आहेत. यावेळी जयंत पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचं पाप या सरकारने केलं होतं, आता महाराजांचे गडकिल्ले पर्यटनाच्या नावाखाली लग्न समारंभ आणि तत्सम पार्ट्यांना देण्याचा घाट सरकारने घातला आहे. याला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आहे
हर्षवर्धन पाटील यांचा आरोपांवर बोलताना ते म्हणाले, 288 जागांवर चर्चा झाली आहे. इंदापूर च्या जागेचा निर्णय शरद पवार आणि राहुल गांधी घेणार होते, पण हर्षवर्धन पाटील यांनी त्याआधीच टोकाची भूमिका घेतली.