'मग ते माझ्या दाढीपर्यंत कसे पोहोचणार?'; उद्धव ठाकरेंच्या विधानावर एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 10:35 AM2024-02-08T10:35:52+5:302024-02-08T10:39:39+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे
मला मुख्यमंत्रिपदाला चिकटून राहायचं असतं तर बसू शकलो नसतो का? मला कळलं नव्हतं का माझे आमदार फुटत होते? त्यांना पकडून हॉटेलमध्ये टाकू शकलो नसतो का? या मिंद्याचं काय, उचलून त्याची दाढी खेचून कुठूनही आणलं असतं, असं विधान माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. कोकण दौऱ्यावर असताना अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला होता.
उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोकणातील सभेत मला दाढी खेचून आणले असते म्हणाले होते, मात्र गेल्या अडीच वर्षात जे वर्षाची माडी उतरू शकले नाहीत. मग ते माझ्या दाढीपर्यंत कसे पोहोचणार?, असा सवाल एकनाथ शिंदेंनी विचारला. तसेच शिवसेनेचा धनुष्यबाण हा प्रभू रामचंद्राचा आणि हिंदुत्वाचा धनुष्यबाण असून या धनुष्यबाणाने वेध घेऊन आपल्याला अहंकाराची, मगृरीची आणि गर्वाची मशाल कायमस्वरूपी विझवायची असल्याचे मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केले.
शिवसेनेचा धनुष्यबाण हा प्रभू रामचंद्राचा आणि हिंदुत्वाचा धनुष्यबाण असून या धनुष्यबाणाने वेध घेऊन आपल्याला अहंकाराची, मगृरीची आणि गर्वाची मशाल कायमस्वरूपी विझवायची असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. कोकणातील सभेत मला दाढी खेचून आणले असते म्हणाले होते, मात्र गेल्या अडीच वर्षात जे… pic.twitter.com/P8BWboIys7
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 7, 2024
कोकण दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर येथेच टीका करून मोदी गॅरंटीद्वारे तयार झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये बसून मुंबईला आले हेच पंतप्रधान मोदींचे यश आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन आम्ही वाटचाल करत असून गेल्या दोन वर्षात घेतलेला प्रत्येक निर्णय सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी घेतला असल्याचे यावेळी नमूद केले. ज्या शिवसैनिकांनी धनुष्यबाण वाचवण्यासाठी घाम गाळला, रक्त सांडले, अंगावर केसेस घेतल्या त्यांनाच आज गद्दार ठरवण्यात येत असल्याची खंत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली.
शिवसंकल्प अभियान - कार्यकर्ता मेळावा |
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 7, 2024
🗓️ 07-02-2024📍तेरणा नगर, ढोकी, जि. धाराशिव. https://t.co/NkZf7KmNZt
रेल्वे ब्रिटिशांनी निर्माण केली अन् काँग्रेसने वाढवली-
रेल्वे भारतीय संपत्ती आहे. भाजपाच्या बापाची नाही. रेल्वे ब्रिटिशांनी निर्माण केली आणि काँग्रेसने वाढवली. दोन-चार नवीन ट्रेन तुम्ही सुरू केल्या, त्या मालकीच्या आहेत का, देश तुमच्या मालकीचा आहे का, या देशाची सार्वजनिक मालमत्ता आहे, तुमची नाही. भाजपावाले मुर्ख आहेत. त्यांना काऊंसिलिंगची गरज आहे, या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सडकून हल्लाबोल केला.