मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोव्याकडे रवाना; मुंबईत एकटेच आलेले, गोटातील आमदारांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 12:00 AM2022-07-01T00:00:43+5:302022-07-01T00:01:13+5:30
शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच गोव्यात थांबलेल्या आमदारांनी जल्लोष केला. यानंतर शिंदे आणि नंतर फडणवीसांनी या आमदारांशी संवाद साधला.
शिवसेनेमध्ये दहा दिवसांपूर्वी बंड करून मविआ सरकार म्हणजेच उद्धव ठाकरेंना सत्तेतून पायऊतार व्हायला लावणारे एकनाथ शिंदे मध्यरात्रीच गोव्याकडे रवाना झाले.
शिंदे गटाचे आमदार गोव्यातील हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. एकटे एकनाथ शिंदेच मुंबईत आले होते. जाताना मुख्यमंत्री पद सोबत घेऊन गेले आहेत. हे सारे अनपेक्षित होते, असे राजकारण्यांचे मत आहे. असे असले तरी शिंदे गटात विन विन सिच्युएशन आहे.
मुख्यमंत्री आपला, राष्ट्रवादी, काँग्रेसचे जोखड उखडून फेकले आणि सोबत उद्याचे भविष्यही सिक्युअर केले, अशा स्थितीत आज शिंदे गटाचे आमदार आहेत. ११ जुलैच्या सुनावणीवेळा काय होईल हे माहिती नाही, परंतू २ आणि ३ जुलैला शिंदे सरकारला बहुमत सिद्ध करायचे आहे. भाजपाचे १३०, शिंदे गटाचे ५० आणि उरलेले शिवसेनेतील १६ पैकी किती येतील माहित नाही, असे शिंदेच म्हणाले आहेत. परंतू एवढे संख्याबळ सत्ता स्थापनेसाठी पुरेसे आहे. यामुळे बहुमत चाचणी शिंदे सरकार लिलया पास करेल.
शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच गोव्यात थांबलेल्या आमदारांनी जल्लोष केला. यानंतर शिंदे आणि नंतर फडणवीसांनी या आमदारांशी संवाद साधला. आता हे आमदार मुंबईत येण्याच्या तयारीला लागले आहेत. या आमदारांना केंद्राची सुरक्षा मिळणार आहे. सोबत महाराष्ट्राचे पोलिसही असणार आहेत.