CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या PA कडून धमकीचा फोन?, राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 08:46 AM2022-07-03T08:46:58+5:302022-07-03T08:48:55+5:30

राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या (PA) नावाने आपल्याला धमकीचा फोन आल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे जळगाव सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केला आहे.

chief minister eknath shinde pa threatening phone call allegation of shivsena leader gulabrao wagh jalgaon | CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या PA कडून धमकीचा फोन?, राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ!

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या PA कडून धमकीचा फोन?, राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ!

googlenewsNext

मुंबई-

राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या (PA) नावाने आपल्याला धमकीचा फोन आल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे जळगाव सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केला आहे. वाघ यांच्या आरोपामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. 

एकनाथ शिंदे यांचा पीए बोलतोय असं सांगून आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप जळगावच्या सह-संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी केला आहे. मात्र अशा धमक्यांना आपण भीक घालत नसल्याचं वाघ यांनी म्हटलं आहे. 

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक LIVE UPDATES येथे क्लिक करा

जळगाव जिल्ह्यातील बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेच्यावतीने भव्य आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मोर्चात सहभागी होत असताना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांना मोबाइलवर फोन आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीनं आपण एकनाथ शिंदे यांचा पीए बोलत असल्याचं सांगितलं आणि तुम्ही आमदारांचा विरोध का करत आहात असं विचारलं. विरोध करायचा नाही, नाहीतर तुम्हाला जीवानीशी मारू अशी धमकी फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीनं दिल्याची माहिती खुद्द गुलाबराव वाघ यांनी दिली आहे. 

गुलाबराव वाघ यांनी आक्रोश मोर्चात भाषण करताना याची माहिती दिली आणि प्रत्युत्तर दिलं. "मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. तुम्हाला जे करायचे ते करा, बंडखोराचा यापुढेही विरोध करत राहणार", असं गुलाबराव वाघ म्हणाले. मोर्चाचा समारोप झाल्यानंतर गुलाबराव वाघ यांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांच्या पीएच्या नावानं आपल्याला धमकीचा फोन आल्याचं जाहीर भाषणात सांगितलं. 

खरे शिवसैनिक नेमके आहेत तरी कोण? हे की ते?; कट्टर शिवसैनिकांमध्येही संभ्रम

संबंधित प्रकरणी पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचीही माहिती गुलाबराव वाघ यांनी दिली आहे. दरम्यान, आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याला हात लावला तर आम्ही एकालाही सोडणार नाही अशी प्रत्युत्तरादाखल धमकी शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी दिली. बंडखोरांच्या विरोधात शिवसैनिक एकवटले आहेत आणि त्यांची एकजूट यापुढेही अशीच कायम राहील, असं गुलाबराव वाघ म्हणाले. 

Web Title: chief minister eknath shinde pa threatening phone call allegation of shivsena leader gulabrao wagh jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.